दुचाकीच्या डिकीतून चोरी करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:11+5:302021-04-01T04:40:11+5:30
पाचगणी : दुचाकीच्या डिकीतून रोख १५ हजार व पाच हजार रुपये किमतीचा गॅस गिझर चोरून पसार झालेला चोरटा सहा ...

दुचाकीच्या डिकीतून चोरी करणारा गजाआड
पाचगणी : दुचाकीच्या डिकीतून रोख १५ हजार व पाच हजार रुपये किमतीचा गॅस गिझर चोरून पसार झालेला चोरटा सहा तासात पाचगणी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवित गजाआड केला. गणेश सहदेव नाईक असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळलेली अधिक माहिती अशी, चोरीच्या घटनेची तक्रार बांधकाम ठेकेदार प्रशांत अशोक मोरे (४०, रा. गोडवली, ता. महाबळेश्वर ) यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार त्यांच्याकडे असणारे जेसीबी चालक नाव गणेश सहदेव नाईक (राहणार हुडको कॉलनी विजापूर कर्नाटक) याने त्यांच्या दुचाकीच्या डिकीतून रात्रीच्या वेळी १५ हजार रुपये तसेच ५ हजार रुपये किमतीचा गॅस सिलिंडर, रेग्युलेटर असा माल चोरी करून तो पळून गेला होता. त्याचा शोध त्यांनी घेतला. परंतु तो मिळून आला नाही. म्हणून त्यांनी मंगळवारी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर हवालदार रसाळ, पोलीस नाईक कांबळे, पोलीस नाईक कदम यांनी शिरवळपर्यंत फुटेज तपासून चोरट्याला जेरबंद केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे खराडे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनखाली पाचगणी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केलेली आहे.