सराफा दुकानावर डल्ला मारणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:46 IST2021-09-24T04:46:44+5:302021-09-24T04:46:44+5:30

लोणंद : येथील येथील पुणे-सातारा रस्त्यावरील लक्ष्मी प्लाझा बिल्डिंगमधील लक्ष्मी गोल्ड ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाच्या दिवशीच दिवशी गुरुवार, दि. ९ ...

Gajaad hitting a bullion shop | सराफा दुकानावर डल्ला मारणारा गजाआड

सराफा दुकानावर डल्ला मारणारा गजाआड

लोणंद : येथील येथील पुणे-सातारा रस्त्यावरील लक्ष्मी प्लाझा बिल्डिंगमधील लक्ष्मी गोल्ड ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाच्या दिवशीच दिवशी गुरुवार, दि. ९ रोजी पुरुष व एका महिलेने हातचलाखीने दुकानातील १ लाख ८६ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली होती. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जोत्स्ना सुरज कछवाय, नीलेश मोहन घुते अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलीस पथकाने जोत्स्ना सुरज कछवाय (वय २९, रा. आंबेगाव खुर्द, पुणे) व नीलेश मोहन घुते (३४, रा. गुजरवाडी फाटा, कात्रज पुणे) यांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ८६ हजार रुपयाचे दागिने तसेच गुन्हा करण्याकरिता वापरलेली वॅगनर कार जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

230921\img-20210923-wa0178.jpg

लोणंद येथील ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटनाला दिवशी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या आरोपींचा लोणंद पोलीसांनी केले अटक

Web Title: Gajaad hitting a bullion shop