शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

गड-किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण, शिवप्रताप दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:57 IST

शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी किल्ले प्रतापगडावरील वातावरण शिवमय बनले

महाबळेश्वर : ‘शिवकालीन धाडशी खेळांचा थरार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिवाजी महाराजांचा जयजयकार अशा स्फूर्तिदायक वातावरणात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. तर याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडकोट आणि किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी घोषणाही केली.महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर बुधवारी शिवप्रताप दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेला भगवा फडकविण्यात आला. त्यानंतर भवानीमातेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी 'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज..., अशा शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारून गेले होते.पोलिस दलाच्या बँड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. यानंतर प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार भरत गोगावले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट किल्ले आजही प्रेरणा देणारे स्रोत आहेत. किल्ल्यांची बांधणी, पाण्याचा साठा, प्रवेशद्वार स्थापत्य ही कलेची उत्तम उदाहरणे आहेत. आज किल्ले प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यानुसार २५ कोटींचा निधी तत्काळ दिला जाईल, असे स्पष्ट केले.शिवप्रतापदिनाला महत्त्व असल्याचे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन आराखड्यास निधी मिळाल्यास संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण होईल. डोंगरी विभागाचे प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न व भूकंपग्रस्तांना दाखले यासह अन्य प्रश्न तत्काळ राज्य शासन सोडवत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे.’‘किल्ले प्रतापगड परिसरात अफजलखानाच्या वधाचे शिल्प उभारण्यात येऊन त्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात येईल, असे पर्यटनमंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.प्रतापगडावर ऐतिहासिक खेळामुळे शिवकाळ...शिवप्रताप दिनानिमित्त ऐतिहासिक खेळात तल्लख असलेल्या विद्यार्थ्यांनी लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शाहिरांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला. या नेत्रदीपक सोहळ्यास शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजEknath Shindeएकनाथ शिंदे