The future of the Giants in Satara is machine-locked today | साताऱ्यात दिग्गजांचे भविष्य आज मशीनबंद

साताऱ्यात दिग्गजांचे भविष्य आज मशीनबंद

 सातारा । जिल्ह्यातील फलटण, वाई, कोरेगाव, माण, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण, पाटण, सातारा या आठ विधानसभा मतदारसंघांसाठी आज (सोमवारी) मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. या निवडणुकीत २0१४ मध्ये निवडून आलेल्या आठ आमदारांसह ७३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी-काँगे्रस व मित्र पक्षांची महाआघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना व मित्र पक्षांची महायुती अशा प्रमुख लढती होणार असल्या तरी वंचित बहुजन आघाडीनेही प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे केले असल्याने आघाडी व महायुतीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. माण, कºहाड उत्तर व कºहाड दक्षिण या मतदारसंघांमध्ये अपक्षांनीही मोठे आव्हान उभे केले आहे. सकाळी ७ वाजता होणार असून, ६ वाजता मतदान पूर्ण होईल.
कडेकोट बंदोबस्त
३,७00 स्थानिक पोलीस, १२00 होमगार्डस्,
केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या ५ तुकड्या, पुणे, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकवरून अतिरिक्त पोलीस बळ साताºयातील पोलिसांच्या मदतीला आले आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे.
कशी मिळवू शकता
मतदान केंद्राची माहिती?
मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा आयोगाच्या ँ३३स्र२://ी’ीू३ङ्म१ं’२ीं१ूँ.्रल्ल/या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या संकेतस्थळावर स्वत:ची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.
मतदारांसाठी ३९६३ व्हीव्हीपॅट
विधानसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच तीन हजार ९६३ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.
कुठे काही गडबड झाली तर काय ?
शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या ५ ते ७ मिनिटांत शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दल तत्काळ धाव घेऊन कारवाई करणार आहेत. सोमवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी हे स्वत: बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.
ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था ?
ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये ९८५ व्हीव्हीपॅट, ७४५ कंट्रोल युनिट तर ७७९ बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध आहेत. सेक्टर आॅफिसरच्या गाडीमध्ये हे यंत्र सुरक्षित राहतील.

Web Title: The future of the Giants in Satara is machine-locked today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.