शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस लाखांच्या विम्यासाठी नसलेल्या बापावर अंत्यसंस्कार, सातारा जिल्ह्यातील अजब घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 15:44 IST

जड अंतःकरणाने मुलाने वडिलांवर काही मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले पण जेव्हा पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने मुलाचे आटलेले अश्रू टिपले तेव्हा भलताच प्रकार समोर आला.

दत्ता यादवसातारा : रुग्णालयातील स्ट्रेचरवर वडिलांचा मृतदेह पाहून मुलाने हंबरडा फोडला. 'बाबा,' अशी हाक मारून वडिलांच्या मृतदेहाला त्याने मिठीही मारली. हे पाहून उपस्थित पोलीस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही गहिवरून आलं. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी मुलाच्या ताब्यात देण्यात आला. जड अंतःकरणाने मुलाने वडिलांवर काही मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले पण जेव्हा पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने मुलाचे आटलेले अश्रू टिपले तेव्हा भलताच प्रकार समोर आला.विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील विडणी-पंढरपूर रस्त्यावर एक अनोळखी पुरुष जातीचा बेवारस मृतदेह पोलिसांना आढळला. या व्यक्तीचा मृतदेह फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला. त्यांची ओळख पटावी म्हणून पोलिसांनी व्हॉटस अॅपवर त्या व्यक्तीचा फोटो व्हायरल केला. त्यावेळी हा फोटो पाहून दादा विलास सुरवसे (वय ३७, रा. मॉडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) हा रुग्णालयात गेला. मृतदेह पाहताच त्याने एकच हंबरडा फोडला.

सरतेशेवटी स्वत: ला सावरून त्याने वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला. रुग्णवाहिकेने मृतदेह विडणी येथे राहात असलेल्या ठिकाणी नेऊन त्याने अंत्यसंस्कार केले पण दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना दादा सुरवसेनं वडिलांचा मृतदेह नेताना कोणालाच बोलावलं नाही. गावकडं मृतदेह नेण्याऐवजी त्यानं विडणीतच अंत्यसंस्कार का केले, अशा शंका आल्या.

तिसऱ्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे आपल्या पथकासह दादाच्या मॉडनिंब गावातील घरी पोहोचले तेव्हा दादाचे वडील विलास मुरलीधर सुरवसे (वय ६२) यांचे एक वर्षांपूर्वीच निधन झाले आहे, असे घरच्यांनी सांगितले. त्यानंतर सुरवसेच्या घरातल्यांना काही एक न सांगता पोलीस पथक तातडीने फलटणकडे निघाले. तसेच फलटण पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता दादा सुरवसेला ताब्यात घेतले.

तो होता मृतदेहाच्या शोधातच...

वडील विलास सुरवसे यांच्या नावावर एका बँकेचा तब्बल ४० लाखांचा विमा होता. मात्र, वडिलांचे अचानक निधन झाल्याने त्याला विम्याची रक्कम घेता आली नाही. त्यामुळे तो बेवारस मृतदेहाच्या शोधातच होता. पैशांसाठी स्वतःच्या वडिलांना विसरून त्यांने दुसऱ्याच्या बापाला बाप मानलं. आधारकार्ड, पॅनकार्ड सेल्फ अॅटेस्टेड करून त्यानं बेवारस मृतदेह आपल्या वडिलांचा असल्याचं भासवलं पण पोलिसांच्या कौशल्यामुळे त्याचा भंडाफोड झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी