जवान लक्ष्मण चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 00:54 IST2016-07-08T23:37:11+5:302016-07-09T00:54:52+5:30

कामथी : जम्मू येथे निधन; मान्यवरांकडून पार्थिवाचे दर्शन

Funeral for Laxman Chavan | जवान लक्ष्मण चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार

जवान लक्ष्मण चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार

किडगाव : कामथी, ता. सातारा येथील जवान लक्ष्मण शिवाजी चव्हाण यांच्यावर जन्मगावी दु:खद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मण चव्हाण यांचे हृदयविकाराने जम्मू येथे निधन झाले होते. निधनाची वार्ता समजताच सारा गाव शोक सागरात बुडाला होता. रात्री सुमारे ३.३० वाजता खासगी रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव कामथी येथे पोहोचले. सारा गाव रात्रभर जागून होता. प्रथम त्यांचे पार्थिव घरात नेले, नंतर मंडळाच्या सभागृहात पार्थिव ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता सजवलेल्या ट्रॅक्टरट्रॉलीतून अंत्ययात्रा सुरू झाली. यावेळी त्यांची पत्नी संध्या, लहान मुलगी श्रुतिका व घरच्यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. ही अंत्ययात्रा न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवर पोहोचली. तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘जब तक सूरज चाँद रहेगा लक्ष्मण तुम्हारा नाम रहेगा’च्या घोषणा दिल्या. यावेळी ‘एनसीसी’ पथकाने त्यांना मानवंदना दिली.यावेळी नायब तहसीलदार बी. आर. मोरे, फिल्ड वर्कशॉपचे हवालदार जी. डी. वाभळे, चेंबूर येथील महिला बालविकास अधिकारी शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश चव्हाण, माजी सभापती धर्मराज घोरपडे, माजी शिक्षण सभापती प्रल्हाद चव्हाण, कण्हेर मंडलाधिकारी चव्हाण, सरपंच शोभा गायकवाड, उपसरपंच अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Funeral for Laxman Chavan