पुसेगाव कोरोना सेंटरला ३० ऑक्सिजन बेडसह निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:39 IST2021-04-27T04:39:43+5:302021-04-27T04:39:43+5:30
पुसेगाव : डीपीसीमधून पुसेगाव कोरोना सेंटरला ३० ऑक्सिजन बेड व इतर सुविधांसाठी १० लाख निधी दिला असल्याचे आ.शशिकांत शिंदे ...

पुसेगाव कोरोना सेंटरला ३० ऑक्सिजन बेडसह निधी
पुसेगाव : डीपीसीमधून पुसेगाव कोरोना सेंटरला ३० ऑक्सिजन बेड व इतर सुविधांसाठी १० लाख निधी दिला असल्याचे आ.शशिकांत शिंदे यांनी सांगितले. खटाव तालुक्यातील उत्तर भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आ.शशिकांत शिंदे यांनी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना सेंटरला भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तसेच उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला.
सध्या पुसेगाव प्राथमिक आरोग्य कोविड केअर सेंटर समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. आ.शिंदे यांनी भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी उपसभापती संतोष साळुंखे, सरपंच विजय मसणे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव, गणेश जाधव, विशाल जाधव, सत्यम जाधव, प्रवीण देवकर उपस्थित होते. कोरोना सेंटरमधील डॉ.प्रियांका पाटील यांनी रुग्ण व सुविधांविषयी माहिती दिली.
ऑक्सिजन बेडच्या लाइनचे काम पूर्ण झाले असून, लवकरच मशीन कार्यान्वित होतील, अशी ग्वाही देऊन आ.शिंदे यांनी अपुऱ्या असणाऱ्या सुविधांसाठी आमदार फंड व जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जाणार असल्याचे सांगितले. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार व जिल्हा व आरोग्य प्रशासन सर्व ताकद पणाला लावून तळागाळापर्यंत जाऊन काम करीत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्तरीय कमिटीने सतर्क राहावे, अशा सूचना केल्या. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोरोना सेंटरमधील उपचार घेत असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जात असलेल्या सुविधा, औषधोपचार याविषयी माहिती जाणून घेतली.
२६पुसेगाव
फोटो ओळ : पुसेगाव (ता. खटाव) कोरोना सेंटरचे पाहणी करताना आ.शशिकांत शिंदे, संतोष साळुंखे, विजय मसणे, सुरेश जाधव, गणेश जाधव आदी उपस्थित होते.