नदीकाठी संरक्षक भिंतीसाठी निधी द्यावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST2021-08-18T04:45:40+5:302021-08-18T04:45:40+5:30
मंत्री जयंत पाटील हे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी गोटे, कऱ्हाड येथील खासदार श्रीनिवास पाटील यांच्या लोकसेवा जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा ...

नदीकाठी संरक्षक भिंतीसाठी निधी द्यावा!
मंत्री जयंत पाटील हे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी गोटे, कऱ्हाड येथील खासदार श्रीनिवास पाटील यांच्या लोकसेवा जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान अतिवृष्टीने जिल्ह्यात झालेले नुकसान, त्याबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजना व विविध विकासकामांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या वेळी सारंग पाटील उपस्थित होते.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे कोयना, कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील नागरिकांचे जीवनमान धोकादायक बनत चालले आहे. कृष्णा नदीकाठी वसलेल्या कऱ्हाड तालुक्यातील कार्वे, कोडोली, दुशेरे, शेरे, गोंदी, रेठरे बुद्रुक व खुबी या सात गावांसह पाल, तांबवे, पोतले, कवठे, कोणेगाव, कोपर्डे हवेली, नवीन कवठे, खराडे, कालगाव, घोणशी, सातारा तालुक्यातील आरळे, महागाव आदी गावांना पुराचा धोका कायम असतो. या गावांमध्ये पुराचे पाणी घुसून येथील साधनसंपत्ती, पशुधन व शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होते. त्यामुळे मोठी वित्तहानी होत असते. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे स्थानिक नागरिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने या गावांच्या नदीच्या बाजूला संरक्षक भिंत होणे आवश्यक आहे. तशी मागणी येथील ग्रामस्थांंनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सादर झाला आहे. या प्रस्तावास मान्यता देऊन पूर संरक्षक भिंतीसाठी आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदार पाटील यांनी या वेळी केली.