पोलीस ठाण्यासमोरच दोन फ्लॅट फोडले

By Admin | Updated: June 18, 2014 01:05 IST2014-06-18T00:46:07+5:302014-06-18T01:05:33+5:30

सातारा शहरातील घटना : अडीच लाखांचा ऐवज लंपास

In front of the police station, two flats were opened in front of the police station | पोलीस ठाण्यासमोरच दोन फ्लॅट फोडले

पोलीस ठाण्यासमोरच दोन फ्लॅट फोडले

सातारा : शहरातील राधिका रस्त्यावर असणाऱ्या विमल एम्पायर इमारतीमधील दोन फ्लॅट केवळ एका तासांत फोडून चोरट्यांनी तब्बल अडीच लाखांचा ऐवज लांबविला. विशेष म्हणजे विमल एम्पायर इमारतीसमोरच सातारा तालुका पोलीस स्टेशन आहे. तरीही पोलिसांना गुंगारा देवून चोरट्यांनी आपला डाव साधला.
सुरेश सर्जेराव जाधव हे सकाळी अकरा वाजता मुलांच्या प्रवेशासाठी बाहेर पडले होते. बरोबर बारा वाजता ते परत आले, त्यावेळी फ्लॅटचे कुलूपच गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आत गेले असता त्यांना कपाटातील मंगळसूत्र, अंगठी आणि कर्णफुले असे पाच तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याच इमारतीत संतोष जयराम जाधव आपल्या कुटुंबासमवेत राहतात. तेही काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्यांच्याही फ्लॅटचे कूलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि दोन गंठण, कर्णफुले असा सहा तोळ्यांचा ऐवज चोरून नेला.
दरम्यान, भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे राधिका रोड परिसरात खळबळ उडाली. या इमारतीच्या गॅलरीतून सातारा तालुका पोलीस ठाणे दिसते. असे असतानाही चोरट्यांंनी फ्लॅट फोडून ऐवज लांबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In front of the police station, two flats were opened in front of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.