पोलिसांसमोरच नगरसेवकासह जमावाचा राडा

By Admin | Updated: January 25, 2017 03:22 IST2017-01-25T03:22:21+5:302017-01-25T03:22:21+5:30

खुन्नस दिल्याच्या कारणावरून नगरसेवकासह जमावाने पोलिसांसमोरच राडा केला. जमावातील युवकांनी एकमेकांना शिवीगाळ

In front of the police, a mob with a corporator Rada | पोलिसांसमोरच नगरसेवकासह जमावाचा राडा

पोलिसांसमोरच नगरसेवकासह जमावाचा राडा

कऱ्हाड (जि. सातारा) : खुन्नस दिल्याच्या कारणावरून नगरसेवकासह जमावाने पोलिसांसमोरच राडा केला. जमावातील युवकांनी एकमेकांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली. यामध्ये एकजण जखमी झाला. याप्रकरणी नगरसेवक मोहसिन अख्तर आंबेकरी यांच्यासह २३ जणांवर गुन्हा दाखल झाला.
शहरातील मुजावर कॉलनीत मंगळवारी दुपारी दोन गटांत वादावादी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी नगरसेवक मोहसिन आंबेकरी यांच्यासह सुमारे २५ जणांचा जमाव एकमेकाला शिवीगाळ, दमदाटी करीत असल्याचे दिसले. पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही ते एकमेकांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करीत होते. जमाव जास्त असल्यामुळे या पोलिस पथकाने जादा बंदोबस्ताची मागणी केली. त्यानुसार काही वेळातच आणखी पोलिस कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. (प्रतिनिधी)

Web Title: In front of the police, a mob with a corporator Rada