आॅपरेटरचा मोर्चा आता नागरपूरला..
By Admin | Updated: December 4, 2014 23:46 IST2014-12-04T21:26:37+5:302014-12-04T23:46:16+5:30
शासन व कंपनी याचा निर्णय घेत नसल्याने

आॅपरेटरचा मोर्चा आता नागरपूरला..
आदर्की : फलटण तालुक्यातील संग्रामकक्ष अंतर्गत काम करणारे डाटा आॅपरेटर दि. १२ नोव्हेंबर पासून वेतनवाढीसाठी संपावर आहेत. शासन व कंपनी याचा निर्णय घेत नसल्याने नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. असे निवेदन अनुप शहा व सुशांत निंबाळकर यांना देण्यात आले आहे.
संग्रामकक्ष अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास ३८०० ते ४१०० रुपये महिन्याला पगार मिळतो. परंतू ग्रामपंचायती कंपनीला ८ हजार रुपये देते. त्यामुळे संग्राम कक्षाअंतर्गत डाटा कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याने दि. १२ नोव्हेंबर पासून आॅपरेटर राज्यव्यापी संपावर केले आहेत. दि. १९ रोजी संघटनेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. शासन व कंपनीने आंदोलनाची दखल न घेतल्याने नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रकाश बोबडे, विजय भिसे, आबासाहेब खांडेकर, सत्यवान टिळेकर, प्रसाद चव्हाण, प्रतिमा नाळे, प्राजक्ता कोरडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)