मदन भोसलेंच्या घरासमोर ‘स्वाभिमानी’चा ठिय्या

By Admin | Updated: July 20, 2014 23:19 IST2014-07-20T23:07:19+5:302014-07-20T23:19:50+5:30

खर्डा-भाकरी आंदोलन : दुसरा हप्ता पाचशे रुपये देण्याची मागणी

In front of Madan Bhosale's house, 'Swabhimani' stitches | मदन भोसलेंच्या घरासमोर ‘स्वाभिमानी’चा ठिय्या

मदन भोसलेंच्या घरासमोर ‘स्वाभिमानी’चा ठिय्या

सातारा : वाई तालुक्यातील भुर्इंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यात या गळित हंगामात गाळप झालेल्या ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन पाचशे रुपये मिळावा, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलकांनी येथे खर्डा-भाकरी खाऊन कारखाना व्यवस्थपनाचा निषेध केला. दरम्यान, ठिय्या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांशी मदन भोसले यांनी चर्चा केली आणि लवकरात लवकर संचालक मंडळाची बैठक घेऊन दराबाबत तोडगा काढण्याची ग्वाही दिली.
ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन पाचशे रुपये मिळावा, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना अध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारी माजी आमदार मदन भोसले यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखाना व्यवस्थानास तोंडी अथवा लेखी म्हणणे देऊनही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. किसन वीर कारखान्याइतके सह-प्रकल्प अन्य कोणत्याही कारखान्याकडे नाहीत. या प्रकल्पातून कारखान्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळत आहे. असे असतानादेखील सभासदांना त्यांचा मोबदला मिळत नाही.
दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच आंदोलकांनी निवासस्थानाच्या बाहेर चटणी, खर्डा-भाकर ठेवली आणि जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर येथे अध्यक्ष मदन भोसले आले आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर दुसऱ्या हप्त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची ग्वाही मदन भोसले यांनी दिली. मात्र, आंदोलकांनी त्यांना दि. ३0 जुलैची अंतिम मुदत दिली. या तारखेच्या आत जर रक्कम जमा नाही झाली तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष अर्जून साळुंखे, संजय भगत, राज्य प्रवक्ते दिलीप तुपे, राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानदेव कदम, जिल्हा सरचिटणीस अल्लाउद्दीन इनामदार, सातारा तालुकाध्यक्ष संजय साबळे, खटाव तालुकाध्यक्ष सुर्यकांत साबळे, जीवन शिर्के, दीपक चव्हाण, दत्तात्रय सुतार, प्रकाश साबळे, रजनीकांत साबळे, अमोल शिंदे, मारुती शिंदे, बाळकृष्ण जाधव, विजय शिंदे, संदीप साबळे, दिलीप वाघमळे, बाळकृष्ण साबळे, पांडूरंग लगस, नंदकुमार जाधव, बजरंग साळुंखे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आंदोलनस्थळावरून आणि संजय भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता यापुढील काळात साखर कारखाने स्वाभिमानीनेच चालवावेत, असे मदन भोसले यांनी स्पष्ट करताच ‘करार करा... किसन वीर कारखाना आम्ही चालवून दाखवितो. एवढेच नव्हे तर सर्व साताऱ्यात आम्ही पेढे वाटतो...’ असे प्रतिआव्हान ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांनी दिले. यावर मदन भोसले यांनी मौन मौन बाळगले. नंतर मात्र, त्यांनी तसे होत नसते. कारखान्याचे अर्थशास्त्र वेगळे आणि बोलणे वेगळे असे सांगत या संपूर्ण विषयाला बगल दिली आणि दुसऱ्या हप्त्याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीनंतर घेण्याचे आश्वासन दिले.

-२२ जुलै : सातारा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी
-२४ जुलै : माजी आमदार शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील निवासस्थानी
-२६ जुलै : कोरेगाव-चिमणगाव येथे जरंडेश्वर कारखाना स्थळ
-२८ जुलै : सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांचे निवासस्थान
-३0 जुलै : डोंगराई कारखाना कार्यस्थळ

Web Title: In front of Madan Bhosale's house, 'Swabhimani' stitches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.