शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

साताऱ्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन, ठेकेदारांकडून पिळवणूक होत असल्याचा केला आरोप

By सचिन काकडे | Updated: November 1, 2023 15:59 IST

सातारा : सातारा पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत नाही, वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली ...

सातारा : सातारा पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत नाही, वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली जाते मात्र त्याचाही तपशील त्यांना दिला जात नाही. या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ करावी, दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान द्यावे आदी प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी सकाळी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.कर्मचाऱ्यांनी घंटानाद व घोषणाबाजी केल्यानंतर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी झालेल्या बैठकीत संघटनेने संबंधित ठेकेदारांकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप केला. गेली दहा-पंधरा वर्षे काम करूनही या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. मिळणारे वेतनही खात्यात जमा केले जात नाही. भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली जाते की नाही याची कर्मचाऱ्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यांना सुरक्षेची साधने देखील पुरवली जात नाही. दिवाळीला पाचशे ते हजार रुपयांचा बोनस दिला जातो. कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तक भरून घेतले जात नाही. काही तक्रार केल्यास उलट कर्मचाऱ्यांनाच दमदाटी करून कामावरून काढून टाकण्याची भाषा ठेकेदारांकडून केली जाते. अशा अनेक तक्रारी संघटनेकडून मुख्याधिकाऱ्यांपुढे मांडण्यात आल्या. या तक्रारींची दखल घेत मुख्याधिकारी बापट यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दालनात बोलावून, योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

अशा आहेत मागण्या..

  • कंत्राटी कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकानुसार ५० टक्के  पगार वाढ केली जावी. पगाराएवढाच दिवाळी बोनस मिळावा
  • कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्याचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जावी
  • नियमानुसार ओळखपत्र दिले जावे तसेच दैनंदिन हजेरी पुस्तकात नोंद केली जावी
  • सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने पुरवावीत 
  • त्यांचा आरोग्य विमा काढला जावा
  • वेतन एकाच दिवशी बँक खात्यामध्ये जमा करावे
टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन