शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणातून एकावर कोयत्याने वार; सातजणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:27 IST

पोलिसांनी संशयितांना अटक केली

कऱ्हाड : जुन्या भांडणाच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण करत कोयत्याने वार केल्याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकजण अल्पवयीन असून, पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला. वारुंजी, ता. कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलसमोर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.अजय विजय सावंत (२३, रा. शनिवार पेठ, कराड) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून शशांक जालिंदर होगाडे (२९), रोहित मारुती होगाडे (३०), आकाश राजू वाघमारे (२२), शुभम गोपाळ साळुंखे (२१), विनायक विवेकानंद होगाडे (३०, सर्व रा. शनिवार पेठ, कराड), यासर ऊर्फ सोन्या कादर शिकलगार ( २२, रा. मलकापूर, कराड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारुंजी येथील सह्याद्री हॉस्पिटलसमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित हातात कोयता व लाकडी दांडके घेऊन मोटारसायकलवरून आले. तेथे त्यांनी अजय सावंत व अविनाश कांबळे यांना थांबवून शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी शशी होगाडे याने अविनाश कांबळे याच्या कानाखाली मारून ‘यांना लय मस्ती आली आहे, मारा यांना’ असे सांगितले. त्यामुळे विनायक होगाडे, सोन्या शिकलगार, शुभम साळुंखे, अक्षय वाघमारे व अल्पवयीन मुलाने दांडक्याने अविनाश यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अजय सावंत सोडवण्यास गेला असता शशी होगाडे व रोहित होगाडे यांनी कोयत्याने सावंत यांच्या डोक्यात, पायावर खांद्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पी. एस. जाधव करत तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी