कैलास स्मशानभूमीत मोफत शुद्ध पाण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:00+5:302021-05-03T04:34:00+5:30
सातारा : कोविडने मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाइकांसाठी कैलास स्मशानभूमी येथे पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात आल्याची माहिती ...

कैलास स्मशानभूमीत मोफत शुद्ध पाण्याची सुविधा
सातारा : कोविडने मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाइकांसाठी कैलास स्मशानभूमी येथे पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात आल्याची माहिती बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी दिली.
कैलास स्मशानभूमी येथे कोविडने मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जवळचे नातेवाईक जिल्ह्यातून येत असतात. कोविडने मृत पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यासाठी शासकीय नियमानुसार १ ते २ तास लागत असतात. अशावेळी या नातेवाइकांना उन्हात वाट बघत बसावे लागते. आधीच जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे नातेवाईक व्यथित झालेले असतात.
या लोकांना आणखीन शारीरिक त्रास होऊ नये म्हणून मृताच्या नातेवाइकांना सावलीत बसवून बिसलरी पिण्याच्या पाण्याची बाटली श्री बालाजी चॅरिटेबलतर्फे आजपासून मोफत देण्यास कर्तव्य म्हणून सुरुवात केली आहे.
यावेळी पत्रकार शरद काटकर, बालाजी ट्रस्टचे संजय कदम, जगदीश खंडेलवाल, जगदीप शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील कैलास स्मशानभूमीत श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोविडमुळे मूर्त पावलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी शुद्ध पाण्याची सुविधा करण्यात आली आहे.