शासकीय रुग्णवाहिकेसाठी मोफत इंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:27+5:302021-05-23T04:39:27+5:30
खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने आठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी बहुतांशी लोक उपचार घेऊन सुखरूप घरी पोहोचले आहेत. ...

शासकीय रुग्णवाहिकेसाठी मोफत इंधन
खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने आठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी बहुतांशी लोक उपचार घेऊन सुखरूप घरी पोहोचले आहेत. मात्र, अद्यापही शेकडो लोक वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या लोकांच्या सेवेसाठी सामाजिक दातृत्व जोपासणारे अनेकजण आपापल्या कुवतीप्रमाणे मदतीचा हात पुढे करीत आहेत. खंडाळ्यातील रिलायन्स पेट्रोलियमचे अभिजित खंडागळे यांनी याच भावनेतून कोरोना रुग्णांना दवाखान्यात आणण्यासाठी अथवा एका दवाखान्यातून दुसऱ्या ठिकाणी उपचारासाठी नेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या परवानगीने रुग्णवाहिकेला मोफत डिझेल इंधन पुरवठा सुरू केला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांना दिलासा मिळत आहे.
कोट :
खंडाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी मोठी गर्दी होते. नातेवाइकांना रुग्णाला अचानकपणे दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागते. रुग्णवाहिका असली तरी त्याच्या इंधनाच्या खर्चाचा प्रश्न कधी कधी भेडसावतो. यासाठी सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून स्वखर्चाने इंधन पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे लोकांना थोडीफार मदत होत आहे.
- अभिजित खंडागळे,
रिलायन्स पेट्रोलियम खंडाळा.