कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना यशोदामध्ये मोफत शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:51+5:302021-06-04T04:29:51+5:30

सातारा कोरोनामुळे जिल्ह्यात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक कुटुंबांतील कमावती व्यक्ती मग ती पुरुष असेल किंवा ...

Free education in Yashoda for children orphaned by corona | कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना यशोदामध्ये मोफत शिक्षण

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना यशोदामध्ये मोफत शिक्षण

सातारा

कोरोनामुळे जिल्ह्यात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अनेक कुटुंबांतील कमावती व्यक्ती मग ती पुरुष असेल किंवा स्त्री

अशा व्यक्तीचे कोरोनामुळे आकस्मिक निधन झाले. त्या कुटुंबातील मुलांच्या

भविष्यातील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना शिक्षण मिळावे यासाठी

यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी या मुलांना मोफत

शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे काही मुलांचे आईवडील दोघेही दगावले आहेत. त्यांची मायेची छाया पूर्णपणे हरवलेली आहे.

अशा लहान मुलांवर म्हणजेच बालवाडी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असतील किंवा त्यांना शिक्षण घ्यायचे

असेल अशा सातारा जिल्ह्यातील सर्व मुलांना ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्या मुलांना

बालवाडी ते बारावीपर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी त्यांना लागणारी सर्व वह्या, पुस्तके, गणवेश त्यांची असणारी सर्व शालेय फी त्यांच्याकडून न घेता त्यांना पूर्णपणे

मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था यशोदा इन्स्टिट्यूट सातारामध्ये करण्यात आलेली आहे.

कोरोनाचे संकट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे सहकार्य जी मुले अनाथ झाली

आहेत आणि ती आपल्या सातारा जिल्ह्यातील आहेत अशा सर्वांनी या शिक्षणाचा लाभ घ्यावा

व ज्या मुलांना इंग्रजी माध्यम असेल, मराठी माध्यम असेल किंवा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असेल

किंवा काही मुलांना डिप्लोमा मध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशा सर्व मुलांनी संस्थेमध्ये येऊन संपर्क

साधावा व कोणत्याही मुलामुलींनी शिक्षणापासून वंचित राहू नये, अशा प्रकारचे आवाहन

प्रा. दशरथ सगरे यांनी केले आहे.

Web Title: Free education in Yashoda for children orphaned by corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.