शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी-पंढरपूर महामार्गाच्या कामात ठेकेदाराकडून शासन व जनतेची फसवणूक, अधिकारी काम पाहतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 17:44 IST

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या फलटण तालुक्यातील रस्त्याचे काम सुरू

जिंती : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या फलटण तालुक्यातील रस्त्याचे काम सुरू असताना मुरुमीकरण करताना ठेकेदाराकडून चक्क लाल मातीचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठेकेदाराकडून शासन व जनतेची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.केंद्र शासनाने आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गासाठी कोट्यवधीचा निधी दिला असताना ठेकेदाराकडून मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून मुरुम ऐवजी लालमातीचा वापर केला जात आहे. संबंधित भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण वारजे पुणे येथील अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाचा दर्जा वेळच्या वेळी तपासणे आवश्यक आहे; मात्र रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे चाललेले काम हे अधिकारी पाहतात की नाही या विषयी शंका उत्पन्न केल्या जात आहेत.संबंधित ठेकेदाराने प्रशासकीय विभाग यांना हाताशी धरून फलटण तालुक्यात मनमानी नियमबाह्य बेकायदेशीररित्या महामार्गाचे काम सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. महामार्गाच्या संबंधित अनेक कामात त्रुटी ठेवत रस्त्याच्या कामाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला जात असून विकास हवा पण ठेकेदार आवरा अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.फलटण तालुक्यातील पालखी मार्गाचे जे काम सुरू आहे त्या महामार्गावरील रस्त्यावर मुरुम टाकण्याऐवजी लालमाती व काळी माती टाकून काम धूमधडाक्यात सुरू आहे. हजारो कोटी रुपये खर्च करुन देखील या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर या कामाचा उपयोग काय ? कामाचा दर्जा असेल तरच काम जास्त काळ टिकेल; पण दर्जाहीन काम केल्याने सर्व पैसे पाण्यात जातील. त्यासाठी चांगल्या प्रकारचा मुरुम वापरुन दर्जात्मक काम होणे अपेक्षित आहे.

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग निकृष्ट दर्जाचे काम चालू असून संबंधित ठेकेदाराचा मनमानी कारभार चालू देणार नाही. मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्षात परिस्थिती दाखवून देणार. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम थांबवले नाही तर संपूर्ण काम बंद पाडणार आहे. - प्रीतम जगदाळे, युवक काँग्रेस अध्यक्ष, फलटण 

सध्या आळंदी-पंढरपूर महामार्गाच्या रोडसाठी लाल मातीचा वापर होत असले तर याकडे लोकप्रतिनिधींनी कामाकडे लक्ष केंद्रित करावे. आमच्या वारकऱ्यांच्या भावना एकच की महामार्गाचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे. - बंडातात्या कराडकर, ज्येष्ठ कीर्तनकार

टॅग्स :Sa Re Ga Ma Pa Showसा रे ग म पSatara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग