शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जमीन खरेदीच्या नावाखाली २६ लाखांची फसवणूक, शिंगणापूरच्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:31 IST

फलटण : फलटण शहरालगत कोळकी येथे जमीन खरेदी करून देतो, असे सांगून एका दाम्पत्याने कोळकी येथील एकाची सुमारे २६ ...

फलटण : फलटण शहरालगत कोळकी येथे जमीन खरेदी करून देतो, असे सांगून एका दाम्पत्याने कोळकी येथील एकाची सुमारे २६ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, दि. १५ ऑगस्ट २०२० पासून बापू नामदेव शिंगाडे व त्यांची पत्नी रूपाली शिंगाडे (दोघे रा. शिंगणापूर, ता. माण, जि. सातारा) यांनी ‘कोळकी येथील जमीन सर्व्हे नं. ५७/४ मधील ४.५ गुंठे जमीन खरेदी स्वस्तात करून देतो,’ असे सांगून अभिजित जरिचंद सुरवसे (रा. नरसोबानगर, कोळकी, ता. फलटण) यांचा विश्वास संपादन केला. वेगवेगळी कारणे सांगून शिंगाडे दाम्पत्याने तब्बल २६ लाख २० हजार रुपये जमीन खरेदीकरिता व इतर कारणाकरिता स्विकारून जमीन खरेदी करून देण्यास व पैसे परत करण्यास टाळाटाळ केली होती.जमिनीचा व्यवहार ठरल्यानंतरच्या कालावधीत जमिनीचा साठे करार सुरवसे यांच्या नावे करण्याचे ठरलेले असतानाही शिंगाडे याने साठेकरार हा पत्नी व स्वत:च्या नावे करून घेतला होता. जमीन खरेदी व्यवहाराकरिता वेळोवेळी दिलेले एकूण सुमारे २६ लाख २० हजार रुपये परत करण्यास सांगितले असता त्यावेळीही बापू शिंगाडे पैसे परत करतो, असे सांगून चालढकल करू लागला. त्यामुळे सुरवसे यांना जमीन खरेदीसाठी दिलेल्या पैशांबाबत विश्वासघात करून फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली.त्यामुळे शिंगाडे दाम्पत्याच्या विरोधात सुरवसे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण कार्यालयात तक्रारी अर्ज केला होता. तक्रारी अर्जाचे चौकशीवेळी बापू शिंगाडे याने दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजीपर्यंत मुदत मागून पूर्ण पैसे परत करतो, असे लिहून दिले होते. परंतु तारीख संपूनही चालढकल करून पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अभिजित जरिचंद सुरवसे यांनी बापू नामदेव शिंगाडे व त्यांची पत्नी रूपाली शिंगाडे यांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी