शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: माणच्या उद्योजकाची १५ कोटींची फसवणूक, पुण्यातील दहा व्यावसायिकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 16:19 IST

न्यायालयाच्या आदेशानंतर दखल 

म्हसवड : आयात- निर्यातचा व्यवसाय करणाऱ्या माण तालुक्यातील एका उद्योजकाची पुण्यातील एका व्यावसायिकासह दहा जणांनी तब्बल १५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत उद्योजक दशरथ मच्छिंद्र कोकरे (वय ४०, रा. बनगरवाडी, ता. माण, सातारा) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.मनोज सुरेश लुंकड, सुरेखा सुरेश लुंकड, दर्शना मनोज लुंकड (सर्व रा. मार्केट यार्ड, स्वारगेट, पुणे), अनिल चंद्रभान बन्साली, अल्पेश अनिल बन्साली (बिळेवाडी, पुणे), नरेंद्र प्रकाश धोका, सोनल नरेंद्र धोका (रा.को. ऑप. सोसायटी रोहन निलय, पुणे), निजामुद्दीन शेख (कोपरखैराणी, नवी मुंबई), राजश्री रवींद्र कुक्कडवाल (रा. महालक्ष्मी काॅलनी, अकोले), विजय नवलखा (रा. बिळेवाडी, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक दशरथ कोकरे यांचा सीमा शुल्क विभागाचा जप्त केलेला माल सरकारकडून घेऊन त्याचा कर भरून तो माल खुल्या बाजारात विकण्याचा व्यवसाय आहे, तसेच आयात- निर्यात करण्याचाही व्यवसाय आहे. वरील सर्व संशयित एकमेकांचे नातेवाईक व मनोज लुंकड यांचे कर्मचारी आहेत. मनोज लुंकडचे पुण्यात अनेक व्यवसाय आहेत. उद्योजक कोकरे यांची लुंकड यांच्याशी ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये पैशाचे, तसेच जमीन विक्रीचे व्यवहार झाले. उद्योजक दशरथ कोकरे यांची २६ एकर जमीन हडप करण्यासाठी संशयितांनी पुणे येथील बँकेत बोगस खाते उघडून त्या खात्यावर दस्ताएवढ्या रकमा जमा करून त्या रकमा संशयितांनीच परस्पर काढून घेतल्या.यातून संशयितांनी परस्पर रकमा एकमेकांच्या खात्यावर वर्ग केल्या. मात्र, उद्योजक कोकरे यांना त्यांनी अंधारात ठेवून पैसे हडपले. या प्रकारानंतर कोकरे यांनी म्हसवड न्यायालयात वरील संशयितांविरोधात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर वरील संशयितांविरोधात फसवणूक, खंडणी यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ हे अधिक तपास करीत आहेत.

संशयितांकडून खंडणीचीही मागणीया प्रकरणामध्ये कोकरे यांच्या म्हणण्यानुसार संशयितांनी १५ कोटींचा माल खरेदी केला, तर २६ एकर जमीन स्वत:च्या नावावर करून हडपली. ही जमीन परत नावावर करून देण्याचे कबूल केले होते. पैसे परत मागितले असता दमदाटी केल्याचे व खंडणीही मागितल्याचे कोकरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीCourtन्यायालय