हातपंप देखभाल, दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सेवेत चार वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:44+5:302021-09-04T04:46:44+5:30
सातारा : सातारा जिल्हा परिषदेकडील हातपंप देखभाल व दुरुस्तीसाठी नवीन चार वाहने मिळाली आहेत. या वाहनांचे पूजन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ...

हातपंप देखभाल, दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सेवेत चार वाहने
सातारा : सातारा जिल्हा परिषदेकडील हातपंप देखभाल व दुरुस्तीसाठी नवीन चार वाहने मिळाली आहेत. या वाहनांचे पूजन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, देखभाल व दुरुस्तीचे संदीप भुसे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेकडील ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत देखभाल व दुरुस्ती कक्षामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हातपंप व वीजपंपाची संबंधित ग्रामपंचायतीकडून वार्षिक वर्गणी घेऊन देखभाल व दुरुस्ती करण्यात येते. जिल्ह्यात एकूण १२ दुरुस्ती पथके मंजूर असून, चार वाहनांचे आयुष्यमान २० वर्षांपेक्षा अधिक झाले होते. त्यामुळे हातपंप, वीजपंप दुरुस्ती कामामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत देखभाल दुरुस्ती निधीमध्ये विशेष तरतूद करून नवीन चार वाहने खरेदी करण्यात आली. नवीन वाहनांचा दुरुस्ती पथकांमध्ये समावेश झाल्याने हातपंप व वीजपंप देखभाल व दुरुस्तीचे काम सुलभ होणार आहे.
\\\\\\\\\\\\\\\