शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथे अंगावर झाड पडून चार विद्यार्थी जखमी, उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:34 IST

मार लागल्याने विद्यार्थी भयभीत

सातारा : शाळेत चालत निघालेल्या चार मुलांच्या अंगावर उंबराचे झाड कोसळल्याने ही मुले जखमी झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.आयुष विलास बोरगे, जय संपत शिर्के (इयत्ता सातवी), आर्यन चंद्रकांत शिर्के (इयत्ता पाचवी), समर्थ दीपक शिर्के (इयत्ता दुसरी, सर्व रा. चिखली, ठोसेघर सातारा) अशी जखमी मुलांची नावे आहेत.चिखली, ता. सातारा येथे रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंतीचे काम सुरू होते. मात्र, हे काम अपुरे आहे. या रस्त्यावरून मुले शाळेत निघाली होती. याच वेळी या भिंतीच्या वरील भराव आणि उंबराचे झाड या मुलांच्या अंगावर कोसळले. या घटनेची माहिती शिक्षक राजेंद्र घोरपडे तसेच संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांना थोडा मार लागल्याने विद्यार्थी भयभीत झाले होते. या घटनेची माहिती प्रांताधिकारी आशिष बारकुल यांना समजताच ते तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे हेही दाखल होते. त्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना धीर देत वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे उपचार करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, या घटनेनंतर चिखली येथे घटनास्थळी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी जाऊन तत्काळ पाहणी केली.