शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

खून, दरोडा, अपहरणातील चौघेजण सातारा जिल्ह्यातून हद्दपार 

By दत्ता यादव | Updated: October 3, 2023 18:42 IST

अकरा महिन्यांत ३५ जण तडीपार..

सातारा : जबरी चोरी, दरोडा, विनयभंग, खंडणी, खून यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नागठाणे, ता. सातारा येथील चाैघांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.टोळी प्रमुख अमित उर्फ कन्हैया सुनील साळुंखे (वय ३२), साहील रुस्तम शिकलगार (२४), अमर उर्फ भरत संजय मोहिते (२६), अशिष बन्सीराम साळुंखे (२७, रा. नागठाणे, ता. सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, या संशयितांनी टोळी तयार करून सातारा जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण केली होती. कऱ्हाड, सातारा, बोरगाव, उंब्रज पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये या महाभागांनी अनेक गुन्हे केले. खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, विनयभंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करणे तसेच खंडणीसाठी अपहरण करून खून करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, कायदेशीर रखवालीमधून पळून जाणे यासारखे गंभीर गुन्हे या टोळीच्या नावावर दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक व कायदेशीर कारवाई करूनही ते जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा आपले उद्योग सुरू करत होते. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला अधीक्षक शेख यांनी मंजुरी दिली असून, वरील चाैघांनाही सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले.या कारवाईसाठी सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलिस नाईक प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला.

अकरा महिन्यांत ३५ जण तडीपार.. नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यंत १२ उपद्रवी टोळ्यांमधील ३५ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यांमधील सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी