शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Satara: चचेगावात ऊसतोडणीवेळी बिबट्याची चार बछडे सापडले, वनविभागामुळे दोन तासातच आईच्या कुशीत विसावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:33 IST

मलकापूर : ऊसतोड सुरू असताना बिबट्याची चार बछडे आढळून आली आहेत. चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील बाराबाईची विहीर नावाच्या शिवारात ...

मलकापूर : ऊसतोड सुरू असताना बिबट्याची चार बछडे आढळून आली आहेत. चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील बाराबाईची विहीर नावाच्या शिवारात राहुल पवार यांच्या शेतात बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, त्याच शेतात बिबट्या मादी आणि बछड्यांची पुनर्मिलन करण्यात येणार आहे, अशी माहिती वनाधिकारी ललिता पाटील व आनंदा जगताप यांनी दिली. वनविभागामुळे दोन तासातच बिबट्याची चार पिल्ले आईच्या कुशीत विसावली.चचेगाव (ता. कऱ्हाड) येथे बाराबाईची विहीर नावाच्या शिवारात एका तळावर वीस ते पंचवीस एकर उसाचे क्षेत्र आहे. या परिसरात बिबट्यांचा वावर आहे, हे यापूर्वीच माहीत असल्यामुळे चचेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून ऊसतोडी राहिल्या होत्या. काही दिवसांपासून भीतीच्या छायेतच ऊसतोडणी सुरू होती. बुधवारी सकाळी राहुल पवार यांच्या शेतात ऊसतोडणी मजूर ऊस तोडण्यासाठी गेले होते. ऊस तोडत असताना सकाळी त्यांना बिबट्याची चार बछडे आढळून आली. यामुळे जवळच कुठेतरी मादी बिबट्या असणार या भीतीने ऊसतोडणी काहीकाळ थांबविण्यात आली. या घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली. कऱ्हाड वन विभागाचे वन अधिकारी ललिता पवार व वनक्षेत्रपाल आनंदा जगताप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित बिबट्याची बछडे ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी संध्याकाळीच बछडे आणि मादी बिबट्याचे पुनर्मिलन घडविण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. मात्र, शेतकरी आक्रमक झाले असून, पुनर्मिलन करण्यासोबत बिबट्याला पिंजरा लावून पकडण्याची मागणी करण्यात येत आहे.बिबट्याला पकडण्यासाठी विशेष परवानगी..वन विभागाच्या बदललेल्या नियमामुळे बिबट्याला पकडण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते; परंतु ती परवानगी मिळत नसल्याने केवळ पुनर्मिलन करून त्याच ठिकाणी बिबट्याची बछडे व बिबट्या मादीचे निवासस्थान राहणार आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळणार आहे. मात्र, यावरून वन विभागाचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत वादावादी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याforest departmentवनविभाग