सातार्‍यात न्यायाधीशांच्या घरात चार लाखांची चोरी

By Admin | Updated: May 10, 2014 23:36 IST2014-05-10T23:36:42+5:302014-05-10T23:36:42+5:30

सातारा : येथील जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेले न्यायाधीश राहुल मनोहर चौतरे (वय ३९, रा. रिमांड होमजवळ, सातारा) यांच्या घरातून अज्ञात

Four lakhs of piracy in judicial house in Satara | सातार्‍यात न्यायाधीशांच्या घरात चार लाखांची चोरी

सातार्‍यात न्यायाधीशांच्या घरात चार लाखांची चोरी

सातारा : येथील जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेले न्यायाधीश राहुल मनोहर चौतरे (वय ३९, रा. रिमांड होमजवळ, सातारा) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे चार लाखांचा ऐवज चोरून नेला. न्यायाधीश आपल्या कुटुंबासमवेत दि. ४ रोजी परगावी गेले होते. दि. ८ रोजी ते परत आले. त्यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या चार बांगड्या, सोन्याचा गोफ, पाचूचा सेठ, मिनी मंगळसूत्र, सहा टॉप्स असा सुमारे चार लाख पाच हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी शोध सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Four lakhs of piracy in judicial house in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.