सातार्यात काविळीचे चार रुग्ण
By Admin | Updated: May 29, 2014 00:34 IST2014-05-29T00:34:16+5:302014-05-29T00:34:29+5:30
कारणांचा शोध सुरू

सातार्यात काविळीचे चार रुग्ण
सातारा : सदर बझार परिसरात पालिकेतर्फे राबविलेल्या शोधमोहिमेत काविळीचे चार रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ही साथ दूषित पाण्यामुळे आली की अन्य कारणांनी, याचा शोध घेण्यात येत आहे. सदर बझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात काविळीची साथ पावसाळ्याच्या तोंडावरच पसरत चालल्याने प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. हा बहुतांश झोपडपट्टी विभाग असून, अस्वच्छता, दूषित पाणी आणि इतरही अनेक कारणे या साथीमागे असू शकतात. त्या दृष्टीने पालिकेने साथीचे मूळ कारण शोधण्याच्या प्रयत्नांना आज, बुधवारी प्रारंभ केला. या भागातील जलवाहिन्यांची गळती काढण्याचे काम तीन ठिकाणी सुरू केले असून, परिसरातील बाधित रुग्णांच्या रक्ताचे नमुनेही घेतले आहेत. पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून, रक्ताचे नमुनेही पाठविले जाणार आहेत. त्यांच्या तपासणीनंतरच ही साथ नेमकी कशामुळे उद््भवली, याबाबत निश्चित सांगता येईल, असे पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)