शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या धडकेत चौघेजण जखमी, वाई पोलीस ठाण्यात फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:01 IST

मेणवली-वाई रस्त्यावर दोन दुचाकींच्या धडकेत एक गंभीर तर तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्ना दत्तात्रय तुपे (रा. वासोळे, ता. वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देदुचाकींच्या धडकेत चौघेजण जखमी, वाई पोलीस ठाण्यात फिर्याद चहाच्या बहाण्याने आलेल्या युवकाने गंठण लांबविले​​​​​​​

वाई : मेणवली-वाई रस्त्यावर दोन दुचाकींच्या धडकेत एक गंभीर तर तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्ना दत्तात्रय तुपे (रा. वासोळे, ता. वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. ३० रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास रत्ना तुपे, त्यांचे पती दत्तात्रय तुपे व मुलगी दर्शना हे वडापावचा गाडा बंद करून गावी निघाले होते. त्यावेळी दत्ता प्रकाश सूर्यवंशी (रा. बालेघर, ता. वाई) हे मेणवलीकडून वाईच्या दिशेने दुचाकीवरुन येत होते. त्यावेळी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दत्ता सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले. तर तुपे कुटुंबीय किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी सूर्यवंशी यांच्यावर वाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चहाच्या बहाण्याने आलेल्या युवकाने गंठण लांबविलेशिरवळ : खंडाळा तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक विवाहितेच्या गळ्यातील १३ ग्राम वजनाचे गंठण अज्ञात युवकाने चहा घेण्याचा बहाणा करून चोरून नेले. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोळी, ता. खंडाळा याठिकाणी प्रिया सचिन कदम यांचे हॉटेल आहे. गुरुवार, दि. २ मे रोजी प्रिया कदम या हॉटेलवर असताना अंदाजे ३५ वर्षे वयाच्या युवकाने चहा देण्याची मागणी केली. प्रिया कदम या चहा बनविण्यासाठी बाहेर ठेवलेल्या जारमधील पाणी घेत होत्या.

त्यावेळी संबंधिताने प्रिया कदम यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कदम यांनी रोखले. तरीही गंठणमधील अर्धा हिस्सा युवकाच्या हाती लागला. त्यानंतर त्याने पोबार केला. यावेळी संबंधित युवक हा नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून लोणंद बाजूकडे पसार झाला. याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनला प्रिया कदम यांनी तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर