शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Khambatki Ghat: खंबाटकी घाटात वाहतुकीचा बोजवारा!, चार तास वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:11 IST

तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती, त्यामुळे प्रवासी वैतागून गेले.

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात खामजाई मंदिरालगत एक मोठा कंटेनर अचानक बंद पडल्याने घाट रस्ता ठप्प झाला होता. कंटेनर बोजड असल्याने तो बाजूला काढणे जिकरीचे झाले. त्यातच मे महिन्याच्या सुट्या असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यामुळे खंबाटकी घाटाच्या पायथ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती, त्यामुळे प्रवासी वैतागून गेले.पुण्याहून-साताऱ्याकडे जात असताना घाटमाथ्यावर दत्तमंदिर व खामजाई मंदिर परिसरात चार पदरीचे काम रखडल्याने येथे सिंगल लेन सुरू होते. यामुळे येथे वाहने बंद पडून अनेक वेळा घाट जाम होत असतो, तसेच या ठिकाणी एक कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.सकाळपासून वाहतूक वाढल्याने खंबाटकी घाटात अचानक वाहतूक कोंडी झाली. अनेकांची तारांबळ पहायला मिळाली. दरम्यान, कोंडी झालेली काही वाहने कॅनॉल मार्गे बोगद्याकडे गेली. त्यामुळे बोगद्यामार्गे वाहतुकीला अडचणी होत होत्या. पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत होते. खंडाळा पोलिसांनीही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत घाटातील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.अपुऱ्या सुविधा..महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याची कामे केली आहेत. मात्र खंबाटकी घाटात वाहतुकीस अडथळा झाल्यास तो काढण्यासाठी मोठ्या क्रेन नाहीत. प्राधिकरण व ठेकेदार टोल वसुली करतात मग महामार्गावर सुविधा का देत नाहीत, असा प्रश्न प्रवाशांना पडला होता. पुरेशी साधने नसल्याने महामार्ग वाहतूक पोलिसांचीही मोठी अडचण झाली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्ग