मारहाणप्रकरणी चौघावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:41+5:302021-02-05T09:20:41+5:30
सातारा: येथील जेनिथ केमिकल कंपनीसमोर एकास मारहाण केल्याप्रकरणी चार अनोळखींवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही ...

मारहाणप्रकरणी चौघावर गुन्हा
सातारा: येथील जेनिथ केमिकल कंपनीसमोर एकास मारहाण केल्याप्रकरणी चार अनोळखींवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवार, दिनांक २४ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, कमलेशचंद छगनलाल मुथा (वय ५३, रा. धनश्री अपार्टमेंट, शिंदे कॉलनी, सदरबझार, सातारा) हे रविवारी रात्री जेनिथ केमिकल कंपनीसमोरून जात असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना गाडी आडवी मारली. यामुळे मुथा यांनी त्यांच्या गाडीला ब्रेक मारत गती कमी केली. याचवेळी समोरून एका मोपेडवरुन आलेल्या दोघांनी मुथा यांचा रस्ता अडविला. यामुळे मुथा तेथे थांबले असता मोपेडवरील दोघांनी त्यांच्या गाडीच्या दरवाजातून आत हात घालत गाडीची चावी काढून घेतली आणि मुथा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तुला सोडणार नाही, असे म्हणून मुथा यांना धमकीही दिली. हा प्रकार घडल्यानंतर मुथा यांनी तत्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याची तक्रार दिली.