शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

माजी तालुकाध्यक्षाचा तलवारीने सपासप वार करुन खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 11:45 IST

दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होत तुंबळ हाणामारी झाली.यावेळी झालेल्या मारामारीमध्ये तलवारीसह घातक शस्ञांचा वापर झाल्याने व तलवारीने मयुर शिवतरेवर सहा ते सात वार झाल्याने मयुर शिवतरे हा गंभीर जखमी झाला तर रवि मोटे व योगेश मोटे हे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देपोलीसांनी गंभीर जखमी झालेल्या मयुर शिवतरे याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मयुर शिवतरे याचा मृत्यू झाला.

शिरवळ प्रतिनीधीः मुराद पटेल खंडाळा तालुकयातील धनगरवाडी गावच्या हद्दीतील मोटे वस्तीजवळ दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्षाचा तलवारीने सपासप वार करुन खून करण्यात आला आहे. मयुर कृष्णा शिवतरे (वय २९ रा.धनगरवाडी ता.खंडाळा) असे खून झालेल्या युवा मोर्चाच्या माजी पदाधिका-यांचे नाव आहे. 

याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, धनगरवाडी ता.खंडाळा येथे हायवेलगत मोटेवस्ती आहे.याठिकाणी खंडाळा पंचायत समितीचे विदयमान सभापती मकरंद उर्फ मारुती मोटे हे कुंटूबियासह वास्तव्यास आहे.दरम्यान,सोमवार दि.25 नोव्हेंबर रोजी मकरंद मोटे यांचा मुलगा अनिकेत व मयुर शिवतरे यांच्यामध्ये दुरध्वनीद्वारे शाब्दिक चकमक उडाली होती. यावेळी राञी दहा वाजण्याच्या सुमारास मयुर शिवतरे हा काही लोकांसमवेत मोटे वस्ती याठिकाणी याबाबत विचारणा करायला गेला असता त्याठिकाणी दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होत तुंबळ हाणामारी झाली.यावेळी झालेल्या मारामारीमध्ये तलवारीसह घातक शस्ञांचा वापर झाल्याने व तलवारीने मयुर शिवतरेवर सहा ते सात वार झाल्याने मयुर शिवतरे हा गंभीर जखमी झाला तर रवि मोटे व योगेश मोटे हे गंभीर जखमी झाले. यावेळी घटनेची माहिती मिळताच शिरवळ ,खंडाळा,लोणंद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी पोलीसांनी गंभीर जखमी झालेल्या मयुर शिवतरे याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मयुर शिवतरे याचा मृत्यू झाला.

दरम्यान,याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी सभापती मकरंद मोटे यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेत अटक केली आहे.याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते , अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी भेट दिली असून घटनास्थळी पोलीसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMurderखूनBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी