आशा स्वयंसेविकेला माजी सरपंचाची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:14+5:302021-02-06T05:15:14+5:30
सातारा: तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथे आशा स्वयंसेविकेला जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी माजी सरपंचावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

आशा स्वयंसेविकेला माजी सरपंचाची धमकी
सातारा: तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथे आशा स्वयंसेविकेला जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी माजी सरपंचावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शीतल प्रकाश बाबर (वय ३६, रा. जोतिबाचीवाडी, ता. सातारा) या आशा स्वयंसेविका असून त्यांना दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माजी सरपंच प्रवीण प्रल्हाद घोरपडे (रा. जोतिबाचीवाडी, ता. सातारा) यांनी शीतल बाबर यांना ''तुम्ही माझ्या घरी का आला,'' असे बोलून वाद घालत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर दारू पिऊन शिवीगाळ केली. यावेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्या कामावर आक्षेप घेत ''तुला बघून घेतो,'' अशी धमकीही दिली.
या घटनेनंतर संपूर्ण प्रकाराची तक्रार लेखी अर्जाद्वारे शीतल बाबर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार सातारा तालुका पोलिसांनी प्रवीण घोरपडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे हे अधिक तपास करत आहेत.