शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

Satara Politics: कराडमधील आदर्श गावच्या माजी सरपंचांनाही 'कमळा'ची भुरळ! 

By प्रमोद सुकरे | Updated: May 28, 2025 17:32 IST

आता जखिणवाडीचे उद्योजक नरेंद्र पाटीलही आमदार भोसलेंच्या गळाला

प्रमोद सुकरे कराड : कराड दक्षिणेत सत्तांतराचे 'कमळ' फुलल्यापासून अनेकांना या 'कमळा'ची भुरळ पडू लागली आहे. गेल्या २/४ महिन्यात अनेकांनी 'हात' सोडत 'कमळा'ला पसंती दिली आहे. आता आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या जखिणवाडीच्या माजी सरपंचांनाही या 'कमळा'ची भुरळ पडली असून काही दिवसात उद्योजक नरेंद्र पाटील आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या गळाला लागणार असे खात्रीशीर समजते.कराड दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील या मंडळींनी या मतदारसंघाचे प्रदिर्घकाळ नेतृत्व केले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या मतदारसंघाचे नेतृत्व केले. पण गत विधानसभा निवडणुकी हा मतदारसंघ त्यांच्या 'हाता'ला लागला नाही.

विधानसभेतील विजयानंतरही डॉ.अतुल भोसले स्वस्थ बसलेले नाहीत.त्यांनी मतदारसंघात भाजपची पाळेमुळे अधिक रुजवण्यासाठी व्ह्यूरचना सुरू ठेवल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी विरोधकांच्या गोटातील काही 'मोहरे' लक्ष करीत ते आपल्या कंपुत घेतले आहेत.नरेंद्र पाटील यांना टाकलेला गळ हा त्याचाच एक भाग मानावा लागेल. या बदलत्या भूमिकेने वारुंजी जिल्हा परिषद गटातील समीकरणे बदलली तर आश्चर्य वाटायला नको.

मिनी विधानसभेची तयारीडॉ.अतुल भोसलेंनी विधानसभा जिंकली. त्यांना मिनी विधानसभा जिंकायची आहे.आतातर ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तसेच तालुक्यातील पुढचे राजकारण सोयीची करायचे असेल तर पंचायत समिती, नगरपालिका येथे त्यांना भाजपची सत्ता आणावी लागेल. त्यामुळेच बेरजेचे राजकारण सुरू आहे.

त्यांच्यावर आहे डोळा ..तालुक्यात यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांचा मोठा गट होता. या दोन भावांच्यात फूट पडली. दोन गट तयार झाले. याच जुन्या गटाच्या कार्यकर्त्यांवर डॉ. अतुल भोसले यांचा डोळा आहे. 

अशी आहे राजकीय पार्श्वभूमीअँड.नरेंद्र पाटील यांचे कुटुंब मोहिते- भोसले परिवाराशी निगडित राहिले आहे. त्यांचे आजोबा कृष्णाजी नांगरे- पाटील हे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. वडील धोंडीराम नागरे पाटील हे भूविकास बँकेचे व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष होते.यशवंतराव चव्हाणांच्या सांगण्यावरुन यशवंतराव मोहितेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. १९८९ पर्यंत कृष्णा उद्योग समूहाच्या विविध संस्थांवर संचालक म्हणून ते कार्यरत होते. त्यांचे चुलते रामराव पाटील हे यशवंतराव मोहिते पतसंस्थेचे अध्यक्ष होते. सन २००७ साली मोहिते भोसले कुटुंबीयांचे जे मनोमिलन घडून आले त्यात नरेंद्र पाटलांची भूमिका महत्त्वाची होती.ते जखिणवाडी ग्रामपंचायतीत सरपंच होते. त्यांनी गावाला शासनाचे अनेक पुरस्कार मिळवले. 

त्याचं काय करणार? नरेंद्र पाटील यांच्या कुटुंबियांचे काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्याशीही जवळचे नाते आहे. नरेंद्र पाटील अनेक वर्षापासून सागरेश्वर सुतगिरणीचे संचालक आहेत. त्यामुळे राजकीय भूमिका बदलताना त्यांना कदमांचाही कौल घ्यावा लागेल असे बोलले जाते. 

राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे.आपणही भाजपमध्ये प्रवेश करूया अशा भावना कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केल्या आहेत. निर्णय घ्यावा असा त्यांचा दबाव आहे. -  अँड.नरेंद्र पाटील माजी सरपंच,जखिणवाडी 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliticsराजकारणBJPभाजपा