शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

LokSabha 2024: राष्ट्रवादी शरद पवार गटाचा साताऱ्याचा उमेदवार ठरला; घोषणेची औपचारिकता बाकी 

By नितीन काळेल | Updated: April 8, 2024 15:56 IST

१५ एप्रिलला अर्ज भरणार; पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार 

सातारा : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबत दोन दिवसात घोषणा होणार असून सोमवार, दि. १५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुती आणि महाआघाडी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे मतदारसंघ असला तरी उमेदवारी निवडीवरून पेच निर्माण झाला होता. खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरून माघार घेतली. त्यामुळे पक्षापुढे उमेदवार कोण द्यायचा हा प्रश्न होता.यासाठी शरद पवार यांनी साताऱ्यात बैठक घेतली होती. त्यानंतर दोन दिवसात उमेदवार ठरवू असे सांगितले होते. आता या घटनेला आठ दिवस होऊन गेल्यानंतर साताऱ्याचा उमेदवार जवळपास स्पष्ट झाला आहे. याबाबत मंगळवारी किंवा बुधवारी घोषणा होऊ शकते. पवार यांनी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे सोमवार दि. १५ रोजी सातारा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीचे जिल्ह्यातील नेतेही उपस्थित राहणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा उमेदवारीचा तिढा सुटलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाSharad Pawarशरद पवारShashikant Shindeशशिकांत शिंदे