माजी मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:03+5:302021-02-05T09:14:03+5:30
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे शनिवारी सायंकाळी कोपर्डे हवेली येथे आले होते. गावाच्या मध्यभागी असणाऱ्या हनुमान मंदिरासमोरील मैदानात मंडई ...

माजी मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे शनिवारी सायंकाळी कोपर्डे हवेली येथे आले होते. गावाच्या मध्यभागी असणाऱ्या हनुमान मंदिरासमोरील मैदानात मंडई भरते. गावातील शेतकरी शेतातील भाजीपाला विक्रीसाठी आणतात. त्यामुळे कऱ्हाड-मसूर रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासीही येथे भाजीपाला खरेदी करतात. पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून शेतकऱ्यांकडील भाजीपाल्याची खरेदी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य निवासराव थोरात, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अजित पाटील-चिखलीकर, इंद्रजित चव्हाण, सातारा जिल्हा युवक उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, दादासाहेब चव्हाण, जावेद शेख, गजानन आवळकर, आदींसह शेतकरी उपस्थित होते.
मोदी सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, असे एक शेतकरी यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना म्हणाला. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी, आतातरी आपल्याला शहाणे व्हावे लागेल, असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले.
फोटो : ३१केआरडी०३
कॅप्शन : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील भाजी मंडईत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजीपाला खरेदी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.