यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन
By Admin | Updated: November 24, 2014 23:14 IST2014-11-24T22:02:32+5:302014-11-24T23:14:59+5:30
अधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे पुण्यतिथी निमित्त

यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन
कऱ्हाड : अधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे पुण्यतिथी निमित्त कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीचे वतीने आयोजित केलेल्या ११ व्या यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे औपचारीक उद्घाटन प्रगतशील महिला शेतकरी भारती नागेश स्वामी, संभाजी रामचंद्र शिंदे, हणमंतराव सुतार, पोपट जगताप यांच्या हस्ते झाले़ यावेळी माजी सभापती दाजी पवार, माजी उपसभापती सुनिल पाटील, माजी संचालक हिंदूराव चव्हाण, किशोर पाटील, प्रगतशील शेतकरी शंकरराव खरात, कृषि विभाग संचालक डॉ़ के़ व्ही़ देशमुख, पणन महामंडळ कोल्हापूरचे उपव्यवस्थापक सुभाष घुले, गणेश घोरपडे, आनंद कटके, कऱ्हाड उपविभागीय कृषि अधिकारी उत्तम देसाई, शिवप्रसाद मांगले, पशुसंवर्धन उपविभागाचे डॉ़ हिंगमीरे, प्रशासक संपत गुंजाळ उपस्थित होते़ यंदाच्या कृषिप्रदर्शनामध्ये सुमारे ४०० हून अधिक स्टॉल उभारणेत आले असून अधुनिक तंत्रज्ञानाचे आधारीत स्टॉल, खते, औजारे, बी-बीयाणे, उत्पादक कंपन्यांचे स्टॉल, कृषि, सहकार, पणन, पशुसंवर्धन आदि शासनाचे विभागाचे स्टॉल प्रदर्शनात सज्ज झाले आहेत़ यावर्षी कृषि माल प्रक्रीया उद्योगांवर भर देण्यात आलेला आहे़ कृषि माल प्रक्रिया उद्योगांना चालना देणारे विविध प्रकल्पाचे सादरीकरण ही होणार आहे़ तसेच या प्रदर्शनामध्ये यावर्षी पाणीटंचाई, मजुरांचा प्रश्न, नापीक जमिनीसाठी उपाय आदींची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे़ प्रदर्शन कालावधीमध्ये विविध पिक, फुले, फळे, भाजीपाला, गाय, म्हैस, बैल प्रदर्शन व स्पर्धा, शेळी-मेंढी, श्वान प्रदर्शन व स्पर्धा व पशुपक्षी प्रदर्शन व स्पर्धा घेण्यात येणार आहेत़ उपस्थित मान्यवरांनी अनेक स्टॉलची पाहणी करून समाधान व्यक्त केले़ (प्रतिनिधी)