वृक्षतोड थांबवून जंगलांना संरक्षण मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:28+5:302021-03-25T04:37:28+5:30
पाटण येथे जागतिक वन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ...

वृक्षतोड थांबवून जंगलांना संरक्षण मिळावे
पाटण येथे जागतिक वन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे, पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष दीपक टोळे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण उपस्थित होते.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, पाटण तालुक्यातील जनतेला मुळातच वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करण्याची सवय असल्याने त्यांनी यापूर्वी शासनाची कोणतीच संकल्पना नसताना झाडे लावली. त्यामुळेच तालुक्यात ठिकठिकाणी हिरवीगार घनदाट जंगले दिसत आहेत. कोकणाप्रमाणे येथील शेतकऱ्यांनी आंबा व फणस लागवड केली आहे. त्यामुळेच येथील आंबा परदेशातही जात आहे. आंबा झाडाबरोबरच इतर झाडांचे संगोपन करुन त्यांचे जतन चांगल्या प्रकारे करत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. मात्र, यावर न थांबता इतर फळझाडे, फुलझाडे, कळक, मानगा या वृक्षाची लागवड करावी.
नगरसेवक सचिन देसाई यांनी स्वागत केले. किरण पवार यांनी आभार मानले.
फोटो : २४केआरडी०१
कॅप्शन : पाटण येथे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक वन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.