वणवा रोखण्यासाठी वन विभागाची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:39+5:302021-03-25T04:37:39+5:30

सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील कऱ्हाड व पाटण तालुक्याला समृद्ध वनक्षेत्र लाभले आहे. विविध ...

Forest Department's campaign to prevent floods | वणवा रोखण्यासाठी वन विभागाची धडक मोहीम

वणवा रोखण्यासाठी वन विभागाची धडक मोहीम

सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील कऱ्हाड व पाटण तालुक्याला समृद्ध वनक्षेत्र लाभले आहे. विविध वनस्पती, प्राणी, पक्षी, आदींचा ठेवा असलेले हे जंगल क्षेत्र गत अनेक वर्षांपासून वणव्यामुळे अक्षरश: होरपळत आहे. उपद्रवी शेजार हे यामागचे एक प्रमुख कारण आहे. जंगलाला लागून असलेल्या मालकी क्षेत्रात प्रतिवर्षी आवश्यकतेनुसार चारा कापणी केल्यानंतर शेतकरी राहिलेले गवत पेटवून देतात. गवत पेटविल्यानंतर पुढच्या वर्षी ते चांगले उगवते, असा त्यांचा समज असल्याने वनविभागाने कितीही प्रबोधन केले तरी ते ऐकण्याच्या आणि भूमिका बदलण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. त्याचा परिणाम मालकीतील आग वनक्षेत्रात घुसून वृक्षसंपदा, पशुपक्षी, कीटक यासह सरपटणाऱ्या तसेच लहान, मोठ्या प्राण्यांच्या जीवितावर होत आहे.

पाटण तालुक्यात १५ हजार ७५४ हेक्टरवरील वनक्षेत्र प्रादेशिक वन विभागाकडे, तर सुमारे १६ हजार हेक्टरवरील वनक्षेत्र वन्यजीव विभागाकडे आहे. कऱ्हाड तालुक्यात १३ हजार ५७० हेक्टर प्रादेशिकचे क्षेत्र आहे. प्रत्येक वर्षी सरासरी ३०० हेक्टरवरील वनक्षेत्र वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहे.

- चौकट

वणवा लावण्याची कारणे

१) गवत जाळले की चांगले वाढते असा गैरसमज

२) वन विभागाची धावपळ करण्यासाठी

३) डोंगरातून ये-जा करताना गंमत म्हणून

४) वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी

५) पेटती सिगारेट गवतात टाकल्यामुळे

- चौकट

वन विभागाच्या उपाययोजना

१) आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई

२) नुकसान भरपाईसह दंडात्मक वसुली

३) माहिती देणाऱ्यास बक्षीस

४) जंगल परिसरात जाळरेषा काढणे

५) वणवा नियंत्रण पथक तयार करणे

६) गावोगावी जनजागृती कार्यक्रम राबविणे

- प्रतिक्रिया

वणवा रोखून जंगल व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वनक्षेत्रपाल विलासराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम हाती घेतली आहे. दुर्गम डोंगराळ भागातील वाडी-वस्तीवर पोहोचून जनजागृतीचे काम सुरू आहे.

- सुभाष राऊत

वनपाल भोसगाव

Web Title: Forest Department's campaign to prevent floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.