वीज वितरण कंपनीची वसुली सक्तीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST2021-03-24T04:37:35+5:302021-03-24T04:37:35+5:30
पुसेगाव : कोरोना तसेच अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पुसेगावसह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले आहे. पाच-सहा वर्षांत ...

वीज वितरण कंपनीची वसुली सक्तीने
पुसेगाव : कोरोना तसेच अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पुसेगावसह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले आहे. पाच-सहा वर्षांत शासनाने कुठल्याही प्रकारचे वीज बिल भरण्याची मागणी ग्राहकांना केली नाही. मात्र सध्या महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. वीज बिले माफ करावीत किंवा पूर्वसूचनेशिवाय एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करू देणार नाही, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत पुसेगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी रणधीर जाधव, सुनील जाधव, भरत मुळे, अंकुश पाटील, अर्जुन मोहिते, हणमंतराव शिंदे, हरी सावंत, विनोद घाडगे, सुसेन जाधव, बाबू वाघ, पृथ्वीराज जाधव, रोहन देशमुख, प्रवीण जाधव, प्रकाश जाधव, यशवंत चव्हाण, प्रदीप देशमुख, दीपक तोडकर, घनश्याम मसणे, श्रीकांत पवार यांच्यासह पुसेगाव पंचक्रोशीतील शेतकरी व वीज ग्राहक नागरिक उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या शेतकरी व सामान्य माणूस आर्थिक अडचणीत आहे. अवकाळी पाऊस, शेतमालाचे पडलेले दर, कोरोना परिस्थितीमुळे आर्थिक चणचण सर्वांना भासत असून अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीच्या वतीने वसुली केली जात आहे. वीज बिल माफ करावे तसेच दमदाटीची भाषा वापरून चाललेली वीज तोडणी त्वरित थांबवावी अन्यथा शेतकरी व सामान्य नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.