आचारसंहितेचे पालन करा : देशमुख

By Admin | Updated: September 22, 2014 00:47 IST2014-09-22T00:46:18+5:302014-09-22T00:47:58+5:30

सातारा : निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा

Follow the Code of Conduct: Deshmukh | आचारसंहितेचे पालन करा : देशमुख

आचारसंहितेचे पालन करा : देशमुख

सातारा : निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना पुणे विभागीय आयुक्त विकास देशमुख यांनी केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात निवडणूक यंत्रणेची तयारी आणि कायदा व सुव्यवस्था याचा आढावा त्यांनी रात्री उशिरा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनंदा गायकवाड त्याचबरोबर सर्व अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारचे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करून विभागीय आयुक्त देशमुख म्हणाले, ‘आवश्यकतेनुसार आचारसंहिता कक्ष, भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करावीत. आचारसंहितेचा कोणी भंग केल्यास कोणताही मुलाहिजा न ठेवता तत्काळ कारवाई करावी.’
निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नि:पक्षपणे व पारदर्शकपणे कार्यवाही करावी. निवडणूका निर्भयपणे आणि शांततत पार पाडाव्यात. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांनी चांगला समन्वय ठेवून सदैव दक्ष आणि सतर्क रहावे, असेही देशमुख म्हणाले.
निवडणूकीच्या निमित्ताने जिल्ह्यात कायदा व सुव्यसथेला बाधा निर्माण होईल अशी मतदान केंद्रे निश्चित करून त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच व्हिडीओ चित्रीकरणही करावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश विभागीय आयुक्त देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Follow the Code of Conduct: Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.