शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

पाटण तालुक्यात फुलतायत स्ट्रॉबेरीचे मळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:26 IST

strawberry Patan Satara- पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठारावर आणि कोयना धरणालगत असलेल्या गावडेवाडी या पवनचक्की प्रकल्पाच्या छायेखाली वसलेल्या गावामध्ये चक्क स्ट्रॉबेरीचे मळे फुलवण्याचे धाडस केले जात आहे. यामागे सातारा येथील श्रमजीवी संस्थेचा हातभार लागत असून नुकतीच प्रायोगिक तत्वावर ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपाटण तालुक्यात फुलतायत स्ट्रॉबेरीचे मळे गावडेवाडीत सात ठिकाणी प्लॉट : श्रमजीवी संस्थेचा पुढाकार

अरुण पवारपाटण : तालुक्यातील वनकुसवडे पठारावर आणि कोयना धरणालगत असलेल्या गावडेवाडी या पवनचक्की प्रकल्पाच्या छायेखाली वसलेल्या गावामध्ये चक्क स्ट्रॉबेरीचे मळे फुलवण्याचे धाडस केले जात आहे. यामागे सातारा येथील श्रमजीवी संस्थेचा हातभार लागत असून नुकतीच प्रायोगिक तत्वावर ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.पाचगणी, महाबळेश्वरसारखाच पाटणचा डोंगर परिसर असून समतोल वातावरण आणि त्याच पद्धतीची खडकाळमिश्रित जमीन हे साम्य आहे. हे निदर्शनास आल्यानंतर गावडेवाडीतील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून श्रमजीवी संस्थेच्या संचालकांनी झरे विकास प्रकल्प योजनेला महत्त्व देऊन प्रायोगीक तत्त्वावर गावडेवाडी येथे स्ट्रॉबेरीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याची योजना अमलात आणली आहे.

त्यापूर्वी श्रमजीवी संस्थेचे संचालक बाळासाहेब कोळेकर यांचे चिरंजीव राम कोळकर यांनी गावडेवाडीच्या २० ते २५ शेतकऱ्यांना पाचगणी, भिलार येथे नेऊन तेथील स्ट्रॉबेरीचे मळे दाखवले. त्यानंतर माजी सरपंच धोंडीराम ताटे, सतीश कदम व इतर शेतकºयांनी सुरुवात म्हणून काही गुंठे क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरीची लागण नुकतीच केली आहे.जिथे गवताशिवाय काही उगवत नाही तसेच जांभा दगडाची विस्तीर्ण पठारे आहेत, त्याच भागात आता स्ट्रॉबेरीचे मळे फुलत आहेत. गावडेवाडी व इतर गावे उंचावर असल्यामुळे वाऱ्याचा दाब आणि जोरदार पाऊस अशी प्रतिकूल परिस्थिती असते.

या वातावरणात स्ट्रॉबेरी पिकवायचा घेतलेला निर्णय म्हणजे अतिशयोक्ती वाटेल. मात्र, गावडेवाडीच्या शेतकऱ्यांनी लावलेले स्ट्रॉबेरीचे प्लॉट सद्यातरी आशादायक दिसून येत आहेत. अवघ्या तीन महिन्यातच त्याचा रिझल्ट दिसणार आहे.

गावडेवाडी आणि परिसरातील युवक नोकरी व व्यवसायानिमित्त पुणे-मुंबईला जातात. त्यापेक्षा व्यावसायिक शेती करण्याचे धाडस केले तर फायदा होईल. हा निर्णय मनामध्ये बाळगून आमच्या संस्थेने पुढाकार घ्यायचे ठरवले. त्यानुसार गावडेवाडी येथे झरे विकास प्रकल्प, स्ट्रॉबेरी, बांबू लागवड आणि सुधारित गहू उत्पादन असे काम प्रायोगिक तत्वावर सुरू केले आहे.- राम कोळेकरश्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ, सातारा

गावडेवाडी गावामध्ये श्रमजीवी सहायक मंडळ आणि अ‍ॅटलास कोपको चॅरिटेबल यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील पाण्याचे स्त्रोत एकत्र करून पाण्याचे झरे विकास प्रकल्प राबवला जात आहे. ठिकठीकाणी मोठे हौद बांधले आहेत. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून गावातील सात शेतकºयांनी स्ट्रॉबेरी या पिकाची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे.- धोंडीराम ताटेमाजी सरपंच, गावडेवाडी

 

टॅग्स :fruitsफळेFarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरpatan-acपाटण