फुले विक्री मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:11+5:302021-09-02T05:23:11+5:30

चिंचणीत मार्गदर्शन सातारा : महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून राज्यभर राबविण्यात येत आहे. आता शेतकरी या ॲपद्वारे ...

Flower sales slowed | फुले विक्री मंदावली

फुले विक्री मंदावली

चिंचणीत मार्गदर्शन

सातारा : महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून राज्यभर राबविण्यात येत आहे. आता शेतकरी या ॲपद्वारे आपल्या पिकांची माहिती मिळू शकेल. पिकांचे अचूक क्षेत्रही कळणार असल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी चिंचणी येथे ई-पीक पाहणी व शेतकऱ्यांना ॲपविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

पारितोषिक वितरण

सातारा : किल्ले वंदनगड ता.वाई येथे शिवराष्ट्र ट्रेकर्सच्या वतीने आयोजित गडकिल्ले प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम पुरातत्व विभाग वास्तू संशोधक हर्षवर्धन गोडसे यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

परीक्षा नोंदणी साठी मुदतवाढ

सातारा : दोन वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत ५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही परीक्षा राज्यभरात १० ऑक्टोबरला होणार आहे. या परीक्षेची जिल्हास्तरीय प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.

Web Title: Flower sales slowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.