A flower that blooms without leaves | पानांशिवायच उमललं फूल

पानांशिवायच उमललं फूल

निसर्गप्रेमी सातारकर घर, बंगल्यासमोर विविध प्रकारची झाडे लावत असतात. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरासमोर असलेल्या एका झाडाला पानं, फळं नाहीत. मात्र फूल मात्र उमलले आहे. हे पाहून मन प्रसन्न होते. (छाया : जावेद खान)

०००००

यात्रांवर परिणाम

सातारा : कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे यात्रा साध्या पद्धतीने साजरी केली जाते.

०००००००

पुन्हा मोबाईल हाती

सातारा : जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू झाल्याने मुलं शाळेत जात होती. त्यामुळे ऑनलाईन अभ्यास अनेक शाळांनी बंद केला होता. मात्र जिल्ह्यातील कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईल आले आहेत.

०००००

चिंच बाजारात

सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात यंदा चिंचेचे उत्पादन वाढले आहे. मात्र शहरात चिंच सहज मिळत नाही. उन्हाळ्यात गृहिणींना स्वयंपाकासाठी चिंचेची मोठी गरज असते. त्यामुळे साताऱ्यातील बाजारात चिंचेला मागणी वाढत आहे. साहजिकच छानपैकी सोललेली चिंच बाजारात विक्रीसाठी आणली जात आहे.

००००

गॉगलला मागणी

सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना गाडी चालविताना डोळ्यांना त्रास होत असतो. या त्रासापासून वाचण्यासाठी दुचाकीस्वार गॉगल खरेदी करत आहेत. साहजिकच शहरातील दुचाकीस्वारांमधून गॉगलला मागणी वाढत आहे.

०००००००

पाणी बचत गरजेची

सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागायला लागली आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई भासू शकते. याचा विचार करून सातारकरांनी आतापासूनच पाणी जपून वापरण्याची गरज आहे. आजही अनेक भागात नळाला तोट्या नसतात. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जात असते.

०००००००

राजवाडा चौकात चेंबरचे झाकण धोकादायक

सातारा : साताऱ्यातील राजवाडा बसस्थानकाजवळ गुरुवारी खड्डा खोदून जलवाहिनीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शेजारीच असलेल्या चेंबरवरील लोखंडी जाळी निम्मी काढली आहे. ती वर आली होती. या ठिकाणीच वळण असल्याने गाड्या त्यावरून जात असतात. त्यामुळे ही लोखंडी जाळी धोकादायक ठरत आहे.

००००००००

ग्रेड सेपरेटर रिकामे

सातारा : साताऱ्यातील पोवईनाक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी ग्रेड सेपरेटर सुरू केला; मात्र पालिकेकडून बसस्थानकाकडे ग्रेड सेपरेटरमधून जाण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे असंख्य सातारकर ग्रेड सेपरेटरचा वापर करण्याऐवजी वरच्या रस्त्यावरुन जाणे पसंत करत आहेत.

००००००

मुलांचे हेलपाटे

सातारा : कोरोनाचा शिरकाव वाढल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारपासून पाचवी ते नववीचे वर्ग बंद करण्याचे आदेश दिले. मात्र अनेक मुलांना हा निरोप गुरुवारी सकाळी मिळाला नाही. त्यामुळे मुलं शाळेत गेली होती. मात्र तेथे सेवकांनी आजपासून ऑनलाईन क्लास असल्याचे सांगितल्यावर ते परत गेले.

०००००००००

वाजंत्रीवाले अडचणीत

सातारा : कोरोनामुळे सुधारित आदेशात लग्न कार्यात वाजंत्री, वाडपी, भटजींसह उपस्थितींवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे अनेक लग्नघरचे वऱ्हाडी कमी होऊ नयेत, म्हणून कमी वाजंत्री लावण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.

००००००००

सुजय चव्हाणचे यश

सातारा : कुराश असोशिएशन ऑफ इंडियाअंतर्गत इंदापूर येथे आयोजित राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत सुजय सुभाष चव्हाण याने वीस वर्षांखालील गटात रजत पदक पटकावले. त्याला अमोल कोरडे यांनी प्रशिक्षण केले. यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे.

०००००००

राजभाषा दिन साजरा

सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील तंत्रनिकेतन, पानमळेवाडी, वर्ये येथे मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बी. ए. कदम, जी. बी. बोधे, प्रा. ए. एस. नलवडे, कीर्ती भोईटे, प्रा. स्वाती जाधव, प्रभारी प्राचार्य डॉ. के. सी. शेख यांनी मनोगत व्यक्त केले.

००००

‘जिजामाता’मध्ये विज्ञान सप्ताह साजरा

सातारा : साताऱ्यातील जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे राष्ट्रीय विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये विज्ञान भित्तीपत्रक, विज्ञान काल आज आणि उद्या’, ‘संत गाडगे बाबा आणि विज्ञान’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी आनंददायी विज्ञान आणि बडबडगिते सादर करण्यात आले. यावेळी प्राचार्या विश्रांती कदम, प्रा. डॉ. तुषार साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: A flower that blooms without leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.