शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जोर कमी; सातारा जिल्ह्यात पूर ओसरला, कोयनाचे दरवाजे तीन फुटांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:47 IST

पाटणला सर्वाधिक नुकसान..; पंचनामे सुरू

सातारा : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, दिवसभरात कोयनाला १७, तर महाबळेश्वरमध्ये १४ मिलिमीटरची नोंद झाली. त्यातच प्रमुख धरणांमधील विसर्ग कमी झाल्याने पूरही ओसरला आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत पावसामुळे २८ घरे आणि ८५ दुकानांना फटका बसल्याचे समोर आले. तरीही, पंचनाम्याचे काम सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे. तर, दिवसभरात कोयनाचे दरवाजाचे १३ वरून ३ फुटांपर्यंत खाली घेण्यात आले आहेत.जिल्ह्यात चार दिवस पाऊस पडला. विशेषत: पश्चिम घाट आणि सातारा, पाटण, जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाली. पश्चिमेकडील प्रमुख सहा धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला. यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करावा लागला. परिणामी अनेक पूल आणि रस्तेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली होती.मात्र, बुधवारी दुपारपासून पाऊस कमी झाला. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ६९, नवजाला ७८, तर महाबळेश्वरला १२५ मिलिमीटर पाऊस झाला. तर, सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयना आणि नवजा येथे प्रत्येकी १७ आणि महाबळेश्वरला १४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.कोयना पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत धरणाचे दरवाजे १३ फुटांवर स्थिर होते. पण, सकाळी सहा वाजता ११ फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. त्यानंतर १० वाजता ९ फूट, दुपारी तीनला ७, सायंकाळी सहाला साडेचार फूट, तर रात्री नऊ वाजता दरवाजे ३ फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. त्यामुळे दरवाजातून १९ हजार ८०० आणि पायथा वीजगृह २ हजार १००, असा एकूण २१ हजार ९०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता. तर, सायंकाळी पाचला कोयना धरणात ९९ टीएमसी पाणीसाठा होता.

पंचनामे करण्याची पालकमंत्र्यांची सूचना..पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी कराड, तसेच सातारा तालुक्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच, कराडला शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन पावसातील नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत. अतिवृष्टीतील मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली.

पाटणला सर्वाधिक नुकसान..पावसामुळे सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात झाले आहे. १६ घरे पडली असून, ७९ दुकाने बाधित झाली आहेत. तर महाबळेश्वर तालुक्यात ५, कराड ३, सातारा २ आणि वाई व फलटण तालुक्यात एक घर पडले आहे. तसेच पाटण तालुक्यात एका शेळीचा मृत्यू झाला आहे. वाई तालुक्यात ६ दुकानदारांनाही नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.