Flooding the Banganga River; Life is shattered ... | बाणगंगा नदीला पूर; जनजीवन विस्कळीत...
बाणगंगा नदीला पूर; जनजीवन विस्कळीत...

फलटण : फलटण तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार कायम आहे. अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरात तसेच शेतात पाणी शिरल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.
ग्रामीण भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. रविवारी फलटण व साखरवाडी येथील आठवडे बाजारावर पावसाचा मोठा परिणाम झाला. नेहमीप्रमाणे विक्री न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. सातारा-फलटण मार्गावर मिरगाव येथे व फलटण-पंढरपूर रस्त्यावर खडकहिरा येथील पुलावरून पावसाचे पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. बाणगंगा नदीलाही पूर आला असून, सस्तेवाडी, कांबळेश्वर वाहतूक सकाळी काही काळ बंद ठेवण्यात आली. कुरवली बुद्रुक, आंदरुड, मिरढे, निंबळक, वाठार स्टेशन येथील ओढ्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जिंती येथे ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने सर्व रस्ते जलमय झाले. तर कोळकी येथे विजेच्या तारांवर झाडाच्या फांद्या पडल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला.
सस्तेवाडी, खुंटे, आसू, विडणी या ठिकाणी प्रचंड पाऊस पडला असून, येथील जनजीवन विस्कळीत
झाले आहे. दरम्यान, पावसाने तालुक्यातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहिल्याने मतपेट्या व कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाºया गाड्यांनाही याचा फटका बसला.
सोमवारी होणाºया मतदानावरही पडण्याची शक्यता असल्याने नेते मंडळी, कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शेतीपिकांच्या नुकसानीची भीती...
रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत फलटण शहरात ३४ मिलिमीटर, बरड ७४, आदर्की ५६, आसू ३५, तरडगाव ६४, गिरवी ३०, राजाळे ४८, होळ ५२ तर वाठार निंबाळकर येथे ४३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस असाच राहिला तर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.


Web Title: Flooding the Banganga River; Life is shattered ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.