साप येथे ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:46+5:302021-02-05T09:11:46+5:30

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप येथील ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेमध्ये मान्यवरांच्याहस्ते तिरंग्याला सलामी देत ध्वजारोहण करून प्रजासत्ताक ...

Flag hoisting at the snake | साप येथे ध्वजारोहण

साप येथे ध्वजारोहण

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप येथील ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेमध्ये मान्यवरांच्याहस्ते तिरंग्याला सलामी देत ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त साप येथील ग्रामपंचायत इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली हाेती. ग्रामसेवक संतोष पाटील यांच्याहस्ते ग्रामपंचायतीसमोर तिरंग्याला सलामी देत ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक शाळेमधील ध्वजारोहण ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष संदीप कदम यांच्याहस्ते करण्यात आले. माध्यमिक शाळेमधील ध्वजारोहण मुख्याध्यापक के. एन. जमदाडे यांच्याहस्ते करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये गतवर्षी इयत्ता दहावीमध्ये प्रथम, दि्‌वतीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य, माजी सरपंच, सदस्य, तलाठी, कृषी सहाय्यक ए. एम. भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो :

साप, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायतीसमोर ग्रामसेवक संतोष पाटील यांनी तिरंग्याला सलामी देऊन ध्वजारोहण केले. (छाया : जयदीप जाधव)

Web Title: Flag hoisting at the snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.