तब्बल आठ क्रीडा प्रकारांमध्ये झेंडा
By Admin | Updated: June 27, 2016 00:39 IST2016-06-26T22:21:46+5:302016-06-27T00:39:53+5:30
मोबाईल आॅफ कॉम्प्युटर आॅन : पाचवडची तिरंगा स्कूलचा उपक्रम , अशी ही जगावेगळी शाळा

तब्बल आठ क्रीडा प्रकारांमध्ये झेंडा
राहुल तांबोळी--भुर्इंज पास होण्यासाठी आवश्यक गुण तर घोकमपट्टी करूनही मिळतात; पण आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी तो शारीरिक तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. हीच बाब ओळखून पाचवड येथील तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूलने क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष वेधले आहे. या शाळेत कराटे, आर्चरी, हॅण्डबॉल, फुटबॉल, व्हॉलिबॉल, खो-खो, क्रिकेट, कबड्डी अशा विविध खेळांच्या प्रशिक्षणाची परिपूर्ण सोय आहे.
पाचवड येथील तिरंगा एक्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलने शाळेत अनेक उपक्रम राबवून वेगळेपण टिकवून ठेवले आहे.
शाळेच्या क्रिकेट टीमने नुकताच राज्यपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला असून, हॅण्डबॉलच्या विभागीय संघात शाळेच्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. आर्चरी खेळात या शाळेचे विद्यार्थी राज्य पातळीवर खेळत आहेत. कराटेमध्ये देशपातळीवर पदकांची लयलूट शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलीच आहे. शिवाय आंतराष्ट्रीय आशियाई स्पर्धेत तब्बल ६ पदकांवर या विद्यार्थ्यांनी तिरंगाचे नाव कोरले आहे.
या शाळेचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे संस्थेत प्रवेशावेळी कोणत्याही प्रकारची देणगी घेतली जात नाही. ‘नो डोनेशन; बट बेस्ट एज्युकेशन’ या ध्येयाने वाटचाल करणारी ही संस्था दुर्मीळ आणि म्हणूनच दखलपात्र ठरते.
संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता गायकवाड, संस्थेचे सचिव तथा चिंधवलीचे माजी सरपंच जयवंत पवार, प्रिन्सिपल वनिता पवार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या काटेकोर देखरेखीखाली संस्थेचा विस्तार होत आहे. सचिव जयवंत पवार यांनी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते.
मोबाईल आॅफ;
कॉम्प्युटर आॅन
शाळेत आल्यानंतर सर्वच्या सर्व शिक्षकांचे मोबाईल फोन स्वीच आॅफ असतात. शैक्षणिक सुविधांबाबत तिरंगा परिपूर्ण आहे. अत्याधुनिक संगणक लॅब, सायन्स लॅब, समृद्ध गं्रथालय येथे आहेच; याशिवाय या सुविधांचा विद्यार्थ्यांना पुरेपूर वापर करावा, याकडे कटाक्ष असतो.
अॅबॅकसमध्ये नो चॅलेंज
अॅबॅकस स्पर्धेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आता आपला जागतिक दरारा निर्माण केला आहे. गेल्यावर्षी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी थायलंड येथे झालेल्या स्पर्धेत नेत्रदीपक यश प्राप्त केले. नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही कामगिरी केली आहे. आता या शाळेचे विद्यार्थी हाँगकाँग दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत.