कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला पाच हजार लग्नांचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST2021-04-25T04:39:00+5:302021-04-25T04:39:00+5:30
सातारा : कोरोना महामारीला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. कोरोनाला वाकुल्या दाखवत गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५००० जणांनी ...

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला पाच हजार लग्नांचा बार
सातारा : कोरोना महामारीला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. कोरोनाला वाकुल्या दाखवत गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५००० जणांनी लग्न केले. रजिस्टर्ड पद्धतीने विवाह करण्यावरदेखील लोकांचा भर असल्याचे दिसते.
विवाह समारंभ थाटात करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. अनेक पालक आपल्या मुलांच्या लग्नासाठी आयुष्यभर कमवलेले पैसे खर्च करतात, तर अनेक जण समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठी बँकांकडून कर्ज काढून अथवा हात उसने पैसे घेऊन विवाह समारंभाचा थाट करतात. कोरोना महामारीमुळे मात्र या थाटातील विवाह समारंभांना आळा बसला. प्रशासनाने विवाह समारंभासाठी मोजक्याच व्यक्तींना उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत, जेथे गर्दी होते, नियमांचे उल्लंघन होते, त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई होत असल्याने विवाह समारंभ थाटात करण्यावर निर्बंध आलेले आहेत.
विवाह सोहळ्यावर निर्बंध आले असल्याने यावर अवलंबून असणारे मंगल कार्यालय चालक, घोडा, वाजंत्री, फटाका व्यावसायिक, केटरर्स, इव्हेंट मॅनेजमेंट टीम यांची उपासमार होण्याची वेळ आलेली आहे. दोन वर्षांपासून कार्यालय ओस पडल्याने कार्यालय बांधकामासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न मंगल कार्यालय चालकांना सतावत आहे.
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) वर्षभरात ८३ लग्नतिथी (बॉक्स)
या वर्षभरामध्ये ८३ लग्नतिथी आहेत. कोरोनामुळे मागील संपूर्ण वर्षभरामध्ये चोरी छुपके विवाह केले. विवाह करण्यासाठी संबंधित तहसीलदारांची परवानगी लागते. त्यात पंचवीस लोकांच्या उपस्थितीतच विवाह करायचा असल्याने लोकांची धांदल उडताना दिसते.
२) २२७ जणांचे रजिस्टर्ड शुभमंगल (बॉक्स)
गेल्या वर्षात २२७ जणांनी रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केले. कोरोनामुळे कमी खर्चात लग्न करण्याची नवी पद्धत रुजू होऊ लागलेली आहे. लोक रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करण्यावर भर देत आहेत. जिल्ह्यात मागील वर्षी २२७ जणांनी रजिस्टर्ड पद्धतीने शुभमंगल उरकले.
३) एप्रिल कठीणच (बॉक्स)
या महिन्यात १३ लग्नतारखा आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत आतापर्यंत ८० रजिस्टर्ड पद्धतीने लग्न झाली. एप्रिल महिन्यामध्ये ७ विवाह रजिस्टर्ड पद्धतीने झाले. एप्रिल महिन्यामध्ये शासनाने लग्न समारंभाबाबत नियम कडक केले असल्याने एप्रिल महिना कठीणच जाणार आहे.
४) मंगल कार्यालय चालकांच्या प्रतिक्रिया
१
कोरोनामुळे आमच्या व्यवसायावर पूर्णपणे पाणी फिरले आहे. मंगल कार्यालय उभारणीसाठी बँकांकडून कर्जे उचलली होती, आता या कर्जाचे हप्ते फेडताना नाकीनऊ येत आहेत. शासनाने आमच्या कोंडीचा विचार केला पाहिजे.
- संदीप मांडवे
२
गेल्या वर्षी लोकांनी मंगल कार्यालयात बुकिंग केले होते. काही लोकांनी किरकोळ ईसार दिला होता, त्यांना पैसे परत करावे लागले. तर ज्यांचे विवाह करण्यात आले त्यामुळे गर्दी झाल्याने कारवाईलादेखील सामोरे जावे लागले आहे.
- बाळासाहेब निकम