कंपनीत चोरी करणारे पाच जण गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:57+5:302021-07-20T04:26:57+5:30

वाई : वाई येथील औद्योगिक वसाहतीतील साई पर्ण या कंपनीत तब्बल ६ लाख ८ हजार पाचशे रुपयांचा ऐवज ...

Five thieves in the company go missing | कंपनीत चोरी करणारे पाच जण गजाआड

कंपनीत चोरी करणारे पाच जण गजाआड

वाई : वाई येथील औद्योगिक वसाहतीतील साई पर्ण या कंपनीत तब्बल ६ लाख ८ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवून अवघ्या बारा तासांत गुन्ह्यातील पाच संशयितांना गजाआड केले.

वर्षा किशोर जाधव (वय २९), उमा रवींद्र जाधव (३०), ज्योती प्रकाश जाधव (२८, तिघे रा. लाखानगर वाई), प्रकाश भीमा मोकलजी (२९), सचिन विलास सपोनिशी (२५, रा. काशीकापडी झोपडपट्टी वाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाई येथील औद्योगिक वसाहतीतील साई पर्ण या कंपनीत मार्च २०२० ते १५ जुलै २०२१ दरम्यान चोरट्यांनी कंपनीमध्ये वॉल कंपाउंडवरून व उघड्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करून कंपनीतील इलेक्ट्रिक मोटारी, स्वीच, पीव्हीसी पाइप व इतर साहित्य असा सुमारे ६ लाख ८ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत डॉ. संजय चंद्रकांत मोरे यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जाणवे-खराडे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी, वाई औद्योगिक वसाहत, बोपर्डी परिसरात गस्त वाढवून खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला असता चोरलेल्या मालासह तीन महिला व दोन पुरुष यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवार, दि. २० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या चोरट्यांकडून कंपनीतून चोरून विकलेला माल व एक टेम्पो हस्तगत केला आहे.

आणखी एका गुन्ह्याची कबुली या चोरट्यांमधील सचिन याने दहा दिवसांपूर्वी दिली. ती मोटार ही हस्तगत केली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलीस फौजदार विजय शिर्के, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, गोळे, महिला पोलीस नाईक सोनाली माने, महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल साळुंखे यांचा सहभाग होता. सहायक पोलीस फौजदार विजय शिर्के तपास करत आहेत.

Web Title: Five thieves in the company go missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.