पाच-सहा वर्षांत येरळा नदी बारमाही प्रवाही होईल
By Admin | Updated: May 13, 2015 00:55 IST2015-05-12T23:07:55+5:302015-05-13T00:55:11+5:30
राजेंद्रसिंह राणा : मास्टर प्लॅन तयार करुन काम करा

पाच-सहा वर्षांत येरळा नदी बारमाही प्रवाही होईल
पुसेगाव : खटाव तालुक्यातील पर्जन्यमान, भौगोलिक परिस्थिती, मातीची पाणी पकडून ठेवण्याची क्षमता. तसेच येरळा नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा मास्टर प्लॅन तयार करून एकजुटीने काम केल्यास कायमस्वरूपी दुष्काळाचा ठपका असणाऱ्या या भागातील येरळा नदी पाच-सहा वर्षांत बारमाही प्रवाही वाहू लागेल,’ असा विश्वास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केला. पुसेगाव, ता. खटाव येथे संत समाज, शासन व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने येरळा नदीचे पुनरुज्जीवन कार्यक्रमाच्या चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल होते. यावेळी उपजिल्हाधिकारी पराग सोमन, श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सातारा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, सभापती प्रभावती चव्हाण, पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव, सरपंच मंगल जाधव, विशस्त अॅड. विजयराव जाधव, तहसीलदार धाइंजे, गटविकास अधिकारी शिंदे, भूमी अभिलेख उपअधीक्षक पवार, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मानाजीराव घाडगे, बाळासाहेब इंगळे, शामराव जाधव, सुभाषराव जाधव, प्रा. टी. एन. जाधव, अभयराजे घाटगे, राजेंद्र घाटगे, प्रकाश जाधव, सुधीर जोशी, प्रा. मुरलीधर साळुंखे आदी उपस्थित होते. डॉ. सुरेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. मोहन गुरव यांनी सूत्रसंचलन केले. प्रकाश जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)
माणसांच्या चुकांमुळे नैसर्गिक संपत्ती नष्ट...
राजस्थानसारख्या वाळवंटी भागात केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी जलबिरादरीच्या माध्यमातून सात नद्या बारमाही प्रवाही करून खऱ्या अर्थाने जलक्रांती केली आहे. हिंंदू संस्कृतीची जलापासून उत्पत्ती झाली आहे. मनुष्यांच्या चुकामळे नदी, तलाव व ओढे ही नैसर्गिक संपत्ती कायमची नष्ट होत चालली आहे. यामुळेच पाण्याचे स्त्रोत कमी होत चाललेले आहेत. याकरिता त्यामधील गाळ, झाडे-झुडपे, अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले.