ग्रामीण भागातील सव्वा लाख कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत : सातारा जिल्ह्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:56 AM2019-06-12T00:56:54+5:302019-06-12T00:57:37+5:30

स्वप्नील शिंदे । सातारा : मराठी भाषेतील शेक्सपिअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तीरेखा साकारणारा ...

 Five lakh families in rural areas are waiting for the house: Pictures of Satara district | ग्रामीण भागातील सव्वा लाख कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत : सातारा जिल्ह्यातील चित्र

शिंरबे, ता. कोरेगाव येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) यांच्या माध्यमातून घर बांधण्यात आले आहे.

googlenewsNext
ठळक मुद्दे‘प्रधानमंत्री आवास’च्या अर्जावर निर्णयच नाही

स्वप्नील शिंदे ।
सातारा : मराठी भाषेतील शेक्सपिअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तीरेखा साकारणारा नट जेंव्हा ‘कुणी घर देता का घर’ हे वाक्य उच्चारतो. तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहतो. नाटकामध्ये बेलवलकर यांच्यावर परिस्थितीमुळे आलेली वेळ आज सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाºया तब्बल १ लाख १७ हजार ४५० कुटुंबांवर आली आहे. कारण दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करूनही अद्याप त्यांना घर मिळाले नाही.

गावातील गट-तटामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेले लोक आजपर्यंत घरकूल योजनेपासून वंचित होते. आवास योजना जाहीर केल्यानंतर जुन्या आणि पडक्या घरात राहणाºया लोकांनी आपला या योजनेत समावेश करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये धाव घेतली. ग्रामसभेत या लोकांची घरासाठी नावेही मंजूर झाली. त्यासाठी ग्रामसेवकांनी अर्जदारांच्या घरी जाऊन आवश्यक माहिती भरून घेतली. गाव पातळीवर आवास योजनेत नाव मंजूर झाले. तसेच प्रशासनाकडून सर्व्हे झाल्यामुळे या योजनेपासून वंचित असलेल्या लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या. अनेक वर्षे जुन्या व पडक्या घरात राहणारे लोक आता आपल्या हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न पाहू लागले. त्यासाठी आवश्यक असणारी तयारीही त्यांनी केली. मात्र, दोन वर्षे उलटून ही अद्याप योजनेस मंजुरी मिळाली नाही.

शासकीय आकडेवारीनुसार सध्या सातारा जिल्ह्यातील गावागावांमधील १ लाख १७ हजार ४८३ लोकांनी नावनोंदणी केली. त्यापैकी ३३ लोकांचे अर्ज नाकारण्यात आले. त्यांची आवास योजनेच्या वेबसाईटवर माहिती भरण्यात आली आहे. त्यांचा ‘ड’ यादीत समावेश केला आहे. अर्जदारांना ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर हेलपाटे मारावे लागतआहे. त्यांना आज ‘कुणी घर देता का घर,’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.


५ हजार ३८६ घरे पूर्ण
प्रधानमंत्री आवास योजनेतून अद्याप ‘ब’ वर्ग यादीमधील घरांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ५ हजार ३८६ घरे बांधून पूर्ण झाली आहेत. तर १ हजार २८२ घर पूर्ण झाली नाहीत.
 



दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ग्रामसभेत नावनोंदणी केली. त्यासाठी ग्रामसेवक व एका अधिकाºयाने घरी येऊन सर्वेक्षण केले होते. अद्यापही घर मंजूर झाले नाही. आज जुन्या घराची पडझड झाली असून, नवीन घर बांधण्याची सध्या ऐपत नाही.
-सुनीता कुºहाडे, अर्जदार

शासनाने २०१२ मध्ये आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण केले होते. त्या यादीनुसार ज्या लोकांना घराची अत्यंत आवश्यकता होती. अशा लोकांना प्राधान्य देण्यात आले असून, त्यांची ‘क’ वर्ग यादी तयारी केली आहे. त्यांना घरे मंजूर झाली आहेत. आगामी काळात ‘ड’ वर्ग यादीतील लोकांना घरे मंजूर होतील.
-अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

Web Title:  Five lakh families in rural areas are waiting for the house: Pictures of Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.